दुपारचं जेवण अगदी व्यवस्थित पोटभरीच झालं तरीही ४ वाजेच्या आसपास आपल्याला छोटीशी भूक सतावते. ही छोटीशी भूक भागवण्यासाठी आपण चहा - बिस्किट, किंवा इतर हलके - फुलके पदार्थ खाल्ले तरीही साधारण सहाच्या आसपास पुन्हा काहीतरी खाण्याची इच्छा होते. अशावेळी नेमकं काय खावं कळत नाही. कारण आपल्याला खूप कमी खायचं असतं. ते खाणं थोडं जरी जास्त झालं तरी त्याचा परिणाम लगेच रात्रीच्या जेवणावर होतो. म्हणून मग बरेचजण संध्याकाळची छोटीशी भूक भागविण्यासाठी कधी एखादं फळ खातात तर कधी चिवडा, लाडू, लाह्या असं काही तोंडात टाकतात(Eating makhana with jaggery know health benefits).
सध्या थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. इतर ऋतूंपेक्षा हिवाळ्यात आपल्याला तुलनेने अधिक जास्त भूक लागते. ही वारंवार लागणारी छोटीशी भूक भागवण्यासाठी आपण नेहमी बिस्कीट, चिप्स, फरसाण असे अनेक पदार्थ आवडीने खातो. परंतु असे अनहेल्दी पदार्थ खाल्ल्याने त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. यासाठी ही छोटीशी भूक भागवण्यासाठी आपण काहीतरी पौष्टिक आणि पोटभरीचे हलके - फुलके पदार्थ खाणे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम राहील. थंडीच्या दिवसात भूक भागवण्यासाठी तसेच थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण गूळ मखाण्याचा पौष्टिक आणि झटपट होणारा खास पदार्थ तयार करु शकतो. थंडीत भूक लागली तर खा पौष्टिक गूळ मखाणा, पहा याची सोपी रेसिपी(health benefits of eating jaggery Makhana in the winter season).
साहित्य :-
१. गूळ - १/२ कप
२. मखाणे - १ कप
३. पांढरे तीळ - १/२ कप (भाजलेले तीळ)
४. साजूक तूप - २ टेबलस्पून
ताज्या टपोऱ्या आवळ्यांची करा बाजारात मिळते तशी आवळा कॅंडी, पाहा रेसिपी; आवळा खा -राहा तरुण...
खाऊन तर पाहा आवळा आणि ओल्या हळदीचा आंबटगोड ठेचा, हिवाळ्यातल्या जेवणाची वाढते रंगत...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका कढईत मखाणे कोरडेच भाजून घ्यावेत. मखाणे कोरडे भाजून घेतल्यांनंतर ते एका डिशमध्ये काढून ठेवावेत.
२. आता गूळ सुरीने चिरुन बारीक करून घ्यावा.
३. त्यानंतर एका कढईत तूप घेऊन त्यात आधी बारीक चिरलेला गूळ घालूंन तो तुपात व्यवस्थित वितळवून त्याची पातळ पेस्ट तयार करुन घ्यावी. गुळाचा पाक होईपर्यंत गूळ व्यवस्थित वितळवून घ्यावा.
४. आता या गुळाच्या पाकात भाजून घेतलेले मखाणे घालूंन ते परतून घ्यावेत. गुळाच्या पाकात मखाणे घोळवून घ्यावे.
५. त्यानंतर या मखाण्यात भाजून घेतलेले पांढरे तीळ भुरभुरवून घ्यावे. सगळे जिन्नस एकजीव करुन चमच्याने हलवून परतवून घ्यावेत.
हिवाळ्यात लोणी लवकर निघत नाही? करा फक्त ३ गोष्टी- झटपट निघेल लोणी-तूपही भरपूर रवाळ...
गूळ - मखाणे खाण्यासाठी तयार आहेत. हे मखाणे एका डिशमध्ये काढून थोडे थंड करुन घ्यावेत. थंड झाल्यावर मखाणे एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवावेत.
गूळ मखाणा खाण्याचे फायदे :-
१. हाडांसाठी फायदेशीर :- थंडीमध्ये हाडांचं जुनं दुखणं उफाळून येत असतं. संधीवाताचा त्रासही या दिवसांत बळावतो. त्यामुळे मखाणे, गूळ आणि तूप एकत्र करून खाणं या दिवसांत फायदेशीर ठरतं. कारण या तिन्ही गोष्टींमध्ये कॅल्शियमचं उत्तम प्रमाण असतं. त्यामुळे हे तीन पदार्थ एकत्र करून खाल्ले जातात.
२. वेटलॉससाठी उपयुक्त :- मखाणे हे लो फॅट डाएट मानलं जातं. त्यामुळे वेटलॉससाठी जे प्रयत्न करत असतात, त्यांनाही मखाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. जर मखाणे गुळासोबत खाल्ले तर गुळामध्ये भरपूर प्रमाणात असणारे लोह शरीरात उर्जा निर्माण करतात. त्यामुळे खूप अधिक वेळ इतर काही न खाताही गूळ मखाणे खाल्ल्याने आपले पोट भरलेले राहते.
३. त्वचेसाठी उत्तम :- हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा वाढतो. त्वचा डिहायड्रेट होऊ लागते. त्यामुळेख मखाणे, गूळ आणि तूप या दिवसांत खाल्ल्यास त्वचेसाठीही ते अतिशय फायद्याचं ठरतं. मखाण्यांमध्ये असलेलं अमिनो ॲसिड त्वचेसाठी अतिशय पोषक ठरतं आणि त्वचेला नवी चमक देतं. तुपामुळेही त्वचा तुकतुकीत होते.