Lobia Benefits : डाळींमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे डाळींचा आपल्या रोजच्या आहारात समावेश करण्याचा सल्ला एक्सपर्ट नेहमीच देत असतात. डाळींमध्ये प्रोटीनसोबतच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असतात. जे आरोग्यासाठी महत्वाचे असतात. एक डाळ अशीही आहे जी तुमच्या शरीराला खूप जास्त मजबूत करू शकते. ही डाळ हिवाळ्यात खाल्ली तर हाडं चांगलीच मजबूत होतात. या डाळीला पोषक तत्वांचं पावरहाऊस मानलं जातं. आम्ही ज्या डाळीबाबत तुम्हाला सांगत आहोत ती डाळ म्हणजे चवळीची डाळ. चवळीमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. अशात जाणून घेऊ चवळी खाल्ल्याने कोणते फायदे मिळतात.
शरीराला ऊर्जा मिळते
चवळीमध्ये मॅगनिज भरपूर प्रमाणात असतं. जे शरीराला लगेच ऊर्जा देतं. सोबतच यातील अॅंटी-ऑक्सिडेंट्स शरीरात ऊर्जा निर्माण करणाऱ्या कोशिका वाढवण्यास मदत करतात. तर चवळीमधील प्रोटीनने मांसपेशी आणि ऊर्जेचा स्तर वाढण्यास मदत मिळते.
हाडं होतील मजबूत
चवळी किंवा चवळीची डाळ हाडांसाठी खूप फायदेशीर मानली जाते. अर्धी वाटी चवळीमध्ये ८ टक्के कॅल्शिअम असतं. ज्यामुळे हाडं मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच जॉइंट्सचं दुखणं किंवा कमजोरीची समस्याही दूर होते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
आयुर्वेद एक्सपर्ट रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चवळी खाण्याचा सल्ला देतात. कारण यात व्हिटॅमिन सी, ए आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे सर्दी, खोकला, वायरल इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
ब्लड शुगर कंट्रोल
चवळी खाल्ल्याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहण्यास मदत मिळते. कारण यात डायटरी फायबर भरपूर असतं. जे पचनक्रिया चांगली होते. अशात ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहण्यात मदत मिळते. तसेच आतड्यांचं आरोग्यही चांगलं राहते.