Lokmat Sakhi >Food > हिवाळ्यात फक्कड चहा प्यायचाय? चहा करताना ‘हा’ पदार्थ घाला, सर्दी - खोकलाही राहील दूर

हिवाळ्यात फक्कड चहा प्यायचाय? चहा करताना ‘हा’ पदार्थ घाला, सर्दी - खोकलाही राहील दूर

Health Benefits of Ginger Tea; Check out How to make Ginger Tea : ठेल्यावर मिळतो तसा 'कडक' चहा करायचा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2024 18:11 IST2024-11-20T12:05:19+5:302024-11-28T18:11:54+5:30

Health Benefits of Ginger Tea; Check out How to make Ginger Tea : ठेल्यावर मिळतो तसा 'कडक' चहा करायचा?

Health Benefits of Ginger Tea; Check out How to make Ginger Tea | हिवाळ्यात फक्कड चहा प्यायचाय? चहा करताना ‘हा’ पदार्थ घाला, सर्दी - खोकलाही राहील दूर

हिवाळ्यात फक्कड चहा प्यायचाय? चहा करताना ‘हा’ पदार्थ घाला, सर्दी - खोकलाही राहील दूर

हिवाळ्यात (Winter Tips) आवर्जुन एक पेय प्यायला जातो. तो म्हणजे चहा (Ginger Tea). चहामध्ये देखील अनेक प्रकार आहेत. साधा चहा, आल्याचा चहा, मसाला चहा, गवती चहा. चहा प्रेमी दिवसभरात २-३ वेळा चहा हमखास पितात. चहा प्यायल्याने शरीर तंदुरुस्त राहते. यासह आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण घरात ठेल्यावर मिळतो तसा फक्कड चहा बनवायचं असेल तर, तसा बनत नाही. जर आपल्याला घरात आल्याचा फक्कड चहा तयार करायचं असेल तर, या रेसिपीला फॉलो करा(Health Benefits of Ginger Tea; Check out How to make Ginger Tea).

आल्याचा चहा पिण्याचे फायदे

हिवाळ्यात आल्याचा चहा पिण्याचे फायदे अनेक आहेत. आल्याशिवाय चहाचा आनंद अपूर्ण आहे. त्यात लोह, जीवनसत्त्वे, अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. आणि संसर्गजन्य रोग बरे होण्यास मदत होते. यासह त्यात मॅग्नेशियम आणि झिंकसारखे खनिजे असतात. जे रक्ताभिसरण सुधारतात.

कोणत्या भाजीत चुकूनही हळद घालू नये? पाहा कारण हळद घातली तर रंग आणि चव तर बिघडेलच पण..

पचनसंस्था सुधारते

आल्याचा चहा प्यायल्याने पचनसंस्था सुधारते. यामुळे गॅस, बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीचा त्रासही कमी होतो. जर पोटाचे विकार दूर राहावे असे वाटत असेल तर, आल्याचा चहा प्या.

गुडघ्यापर्यंत लांब - काळे केस हवेत? खोबरेल तेलात घाला मुठभर 'ही' हिरवी पानं; केस इतके वाढतील की..

आल्याचा चहा कसे करतात?

सर्वात आधी गॅसवर भांडं गरम करण्यासाठी ठेवा. त्यात पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात चहापत्ती, साखर घाला. चहाला उकळी फुटल्यानंतर त्यात किसलेला आलं घाला. हवं तर आपण त्यात आवडीचा चहा मसालाही घालू शकता. नंतर त्यात दूध घाला.

गॅस मंद आचेवर ठेवा. नंतर गॅस बंद करा, गाळणीने गाळून चहा एका कपमध्ये काढून घ्या. अशा पद्धतीने ठेल्यावर मिळतो तसा आल्याचा फक्कड चहा खाण्यासाठी रेडी. 

Web Title: Health Benefits of Ginger Tea; Check out How to make Ginger Tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.