जांभूळ हे आरोग्यासाठी अमृत फळ मानलं जातं. उन्हाळ्यात जसा आंबा आरोग्यासाठी अमृत फळ तसंच पावसाळ्याच्या काळात जांभूळ हे आरोग्यासाठी फायदेशीर फळ असतं. जांभळात असलेल्या लोह तत्वामुळे ॲनेमिया, कावीळ, रक्तदोष या समस्यांवर जांभूळ हे फळ गुणकारी ठरतं. जांभळामध्ये लोह, कॅल्शियम, फाॅस्फरस, क जीवनसत्वं या घटकांचं प्रमाण अधिक असतं. तर थोड्या प्रमाणात जांभळामध्ये ब जीवनसत्व असतं. जांभळात प्रथिनं, खनिजं, फायबर, पिष्टमय पदार्थ आणि थोड्या प्रमाणात फॅटस असतात. जांभळात कोलिना आणि फोलिक ही आम्लंही असतात. जांभळाच्या सेवनामुळे (benefits of jamun) रक्त शुध्द आणि लाल होतं.
Image: Google
पोटदुखी, अपचन, अशुध्द ढेकर येणं अशा विकारांवर जांभळाचं सरबत ( benefits of jamun juice ) पिणं हा उत्तम उपाय आहे. जांभूळ हे गुणधर्मानं पाचक असल्याने न पचलेलं अन्न पचण्यास मदत होते. जांभळाचं सरबत प्याल्यानं स्मरणशक्ती वाढते. जांभळाचं सरबत त्वचाविकारातही फायदेशीर असतं. असं हे अनेक आजारांवर गुणकारी असलेलं जांभळाचं सरबत ( how to make jamun juice) घरच्याघरी सहज करता येतं. 3 प्रकारे जांभळाचं सरबत (types of jamun juice) करता येतं. आपल्याला आवडेल त्या पध्दतीनं जांभळाचं सरबत करुन त्याचे आरोग्यदायी लाभ प्राप्त करण्याचे हे महत्वाचे दिवस आहेत.
Image: Google
जांभळाचं मध घालून सरबत
मध घालून जांभळाचं सरबत करण्यासाठी 1 कप धुतलेली जांभळं बिया काढलेली, 2 कप थंडं पाणी, 1 मोठा चमचा मध, 1 चिमूटभर काळी मिरपूड,1 चिमूटभर मीठ, 1 मोठा चमचा लिंबाचा रस आणि थोडा पुदिना घ्यावा.
जांभळाचं सरबत करताना सर्वात आधी जांभळं धुवून आणि त्याच्या बिया काढून घ्याव्यात. मिक्सरमध्ये किंवा ब्लेण्डरमध्ये 1 कप जांभळं, 1 मोठा चमचा मध, 2 कप थंडं पाणी, काळी मिरेपूड आणि थोडं मीठ घालून ते ब्लेण्डरमधून बारीक पेस्ट स्वरुपात वाटून घ्यावं. वाटलेलं मिश्रण ग्लासमध्ये काढून त्यावर थोडा पुदिना चिरुन घालावा.
Image: Google
गूळ घातलेलं जांभळाचं सरबत
गूळ आणि जांभूळ हे आरोग्यासाठी उत्तम मिश्रण मानलं जातं. हे सरबत तयार करण्यासाठी पाव कप जांभळाचा गर, 2 कप थंडं पाणी, चवीसाठी गूळ आणि चिमूटभर सैंधव मीठ घ्यावं.
जांभळाचं सरबत करताना मिक्सरमधून पाव कप जांभळाचा गर, 2 कप थंडं पाणी, गूळ आणि सैंधव मीठ घालून ते वाटून घ्यावं. मिश्रण जास्त दाटसर झालं असल्यास त्यात थोडं पाणी घालावं.
Image: Google
जांभळाचं साधं सरबत
अगदीच साध्या पध्दतीनं जांभळाचं सरबत तयार करण्यासाठी जांभळं, 1 कप थंडं पाणी घ्यावं. जांभळं धुवून, बिया काढून घयवीत. जांभळाच्या गरात पाणी आणि थोडं मीठ घालावं. हे मिश्रण रवीनं किंवा मिक्सरमधून/ ब्लेण्डरमध्ये घोटून घ्यावं. या पध्दतीनं केलेलं जांभळाचं सरबत छान लागतं. हे सरबत थंडं प्यावं.