Join us

कचरा समजून फेकू नका पपईच्या बिया, अनेक गंभीर समस्या होतील लगेच दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 14:59 IST

Papaya Seeds Benefits : सामान्यपणे सगळेच लोक पपई कापल्यावर त्यातील काळ्या बिया कचरा समजून फेकतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, या बियांमध्येही अनेक पोषक तत्व असतात. 

Papaya Seeds Benefits : वेगवेगळी आंबट, गोड, तुरट फळं खाणं जिभेचं चोचले पुरवणारं तर असतंच, सोबतच आरोग्याला अनेक फायदे देणारं असतं हे काही कुणाला वेगळं सांगायला नको. पपई सु्द्धा एक असंच  फळ आहे जे शरीराला अनेक पोषक तत्व देतं. वजन कमी करणं, पोटासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी गोड, मुलायम पपई खूप फायदेशीर ठरते. सामान्यपणे सगळेच लोक पपई कापल्यावर त्यातील काळ्या बिया कचरा समजून फेकतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, या बियांमध्येही अनेक पोषक तत्व असतात. जे वेगवेगळ्या गंभीर समस्या दूर करण्यास मदत करतात.

पपईच्या बियांमधील पोषक तत्व

पपईच्या बियांमध्ये व्हिटामिन्स, झिंक, फॉस्फोरस, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फायबर आणि अनेक अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जे शरीराचा अनेक समस्यांपासून बचाव करतात. अशात पपईच्या बिया खाऊन काय फायदे मिळतात हे जाणून घेऊया.

पपईच्या बिया खाण्याचे फायदे

किडनी राहते हेल्दी

किडनी शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी आहे. शरीरातील विषारी तत्व लघवीवाटे बाहेर काढण्याचं काम किडनी करतात. पण काही लोकांना किडनीसंबंधी वेगवेगळ्या समस्या असतात. या लोकांसाठी पपईच्या बिया खाणं फायदेशीर ठरू  शकतं. या बियांमध्ये आढळणारे तत्व किडनीमधील विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत करतात.

पोट साफ होतं

पोट साफ न होण्याची म्हणजेच अनेकांना बद्धकोष्ठतेची समस्या होते. अशात पपईच्या या बिया खाणं खूप फायदेशीर ठरेल. पपईच्या बियांमधील प्रोटियोलिटिक एंजाइम आतड्यांमधील बॅड बॅक्टेरिया नष्ट करून गट हेल्थ चांगली करतात. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊन पोट साफ होण्यास मदत मिळते.

कोलेस्टेरॉल कमी करतात

अलिकडे अनेकांना कोलेस्टेरॉल वाढल्याची समस्या होते. पपईच्या बिया हेच शरीरात वाढलेलं आणि हार्ट अटॅकचा धोका कमी करणारं कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतं. पपईच्या बियांमध्ये ओलेक अॅसिड आढळतं जे बॅड कोलेस्टेरॉल कंट्रोल करतं.

डायबिटीसमध्ये फायदेशीर

पपईच्या बिया डायबिटीसच्या रूग्णांसाठी खूप फायदेशीर असतात. बियांमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि फ्लावोनॉइड आढळतात, जे डायबिटीस कंट्रोल करण्यास मदत करतात. त्यामुळे डायबिटीसच्या रूग्णांनी नियमितपणे डॉक्टरांच्या सल्ल्यानं या बिया खाव्यात.

कशा खाल बिया?

- पपईच्या बिया तुम्ही थेट अशाही खाऊ शकता. या बियांची टेस्ट थोडी चटपटीत लागते. आधी थोड्याच बिया खा नंतर प्रमाण वाढवा.

- पपईच्या बिया तुम्ही स्मूदीमध्ये टाकूनही खाऊ शकता. यानं शरीराला अधिक पोषण मिळेल.

- सलाद आणखी टेस्टी आणि वेगळा बनवण्यासाठी तुम्ही यात पपईच्या बिया टाकू शकता. यासाठी पपईच्या बिया बारीक करून सलादमध्ये टाका.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआरोग्य