Lokmat Sakhi >Food > डाळिंबाच्या सालांचा हेल्दी, गरमागरम चहा पिऊन तर पहा, वेटलॉस पासून ते स्किन प्रॉब्लेम्सवर एकच रामबाण उपाय...

डाळिंबाच्या सालांचा हेल्दी, गरमागरम चहा पिऊन तर पहा, वेटलॉस पासून ते स्किन प्रॉब्लेम्सवर एकच रामबाण उपाय...

Pomegranate Peel Tea Recipe : विकतचे केमिकल्सयुक्त चहा किंवा ग्रीन टी पिण्यापेक्षा नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन बनवलेला चहा पिणे कधीही आरोग्यासाठी उत्तम. डाळिंबाच्या सालीचा उपयोग करून घरीच बनवा फक्कड औषधी चहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2023 08:26 PM2023-10-21T20:26:03+5:302023-10-21T20:48:01+5:30

Pomegranate Peel Tea Recipe : विकतचे केमिकल्सयुक्त चहा किंवा ग्रीन टी पिण्यापेक्षा नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन बनवलेला चहा पिणे कधीही आरोग्यासाठी उत्तम. डाळिंबाच्या सालीचा उपयोग करून घरीच बनवा फक्कड औषधी चहा...

Health Benefits Of Pomegranate Peel: How To Make Pomegranate Peel Tea, Pomegranate Peel Tea Recipe | डाळिंबाच्या सालांचा हेल्दी, गरमागरम चहा पिऊन तर पहा, वेटलॉस पासून ते स्किन प्रॉब्लेम्सवर एकच रामबाण उपाय...

डाळिंबाच्या सालांचा हेल्दी, गरमागरम चहा पिऊन तर पहा, वेटलॉस पासून ते स्किन प्रॉब्लेम्सवर एकच रामबाण उपाय...

आत्तापर्यंत आपण डाळिंबाचे दाणे खाण्याचे फायदे ऐकलेच असतील, पण डाळिंबाच्या दाण्यांसोबतच डाळिंबाची सालं देखील तितकीच फायदेशीर असते. डाळिंबाचे लालचुटूक गोड दाणे खाऊन आपण त्याची सालपटं हमखास फेकून देताेच. कारण त्या सालीही आरोग्यासाठी गुणकारी असतात, हे आपल्याला माहितीच नसतं. पण डाळिंबाएवढेच पौष्टिक गुण त्याच्या सालींमध्येही असतात. अगदी आरोग्यापासून ते सौंदर्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी डाळिंबाच्या सालींचा उपयोग होतो. डाळिंबाच्या दाण्यांपेक्षाही त्याच्या सालींमध्ये व्हिटॅमिन - सी मोठ्या प्रमाणावर असते(Save the pomegranate peel and use it for these 5 health benefits).

डाळिंब हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. डाळिंबाचे गोड आंबट दाणे खाणे, डाळिंबाचा ज्यूस पिणे यापध्दतीने डाळिंबाचा आपण उपयोग करतो. असे असले तरीही डाळिंबाच्या सालीमध्ये आरोग्य आणि सौंदर्याचं रहस्य (How to make pomegranate peel tea, Miracle drinks to loose weight ) दडलेलं आहे. वारंवार होणारी केसगळती, स्किन प्रॉब्लेम्स, वाढते वजन, पोटाच्या अनेक तक्रारी, त्वचेवरील एजिंगच्या वाढत्या खुणा अशा अनेक कारणांवर एक उपाय म्हणून डाळिंबाच्या सालींचा चहा आपण पिऊ शकतो. त्यामुळे जर आपण डाळिंब खाऊन त्याची सालं फेकून देत असाल तर थांबा, या सालींचा वापर करुन आपण मस्त गरमागरम हेल्दी चहा (pomegranate peel tea recipe) बनवू शकतो. डाळिंबाच्या सालींचा हा चहा नेमका कसा बनवायचा याचे साहित्य व कृती पाहूयात(How To Make Tea From Leftover peels of pomegranate). 

साहित्य :- 

१. डाळिंबाच्या साली किंवा सालींची पावडर - ३ ते ४ टेबलस्पून 
२. तुळशीची पाने - ४ ते ५ पाने 
३. दालचिनी - २ लहान काड्या 
४. धणे - १ टेबलस्पून
५. पाणी - १.५ कप 

कृती :- 

१. सर्वातआधी एका मोठ्या भांड्यात डाळिंबाच्या साली किंवा त्या सालींची पावडर घ्यावी. 
२. आता यात तुळशीची पाने, दालचिनीच्या काड्या, धणे व पाणी घालावे. 
३. हे सगळे जिन्नस पाण्यांत घालूंन गॅसच्या मंद आचेवर उकळवण्यासाठी ठेवून द्यावेत. 

उपवास करुन वजन कमी करायचं मग खा भरपूर शिंगाडा, शिंगाड्याची फळं म्हणजे तर तब्येतीसाठी वरदान...

उपवास करताना तब्येत बिघडू नये म्हणून कोणते मीठ खावे ? तज्ज्ञ सांगतात, मीठ खाणार असाल तर...

४. आता हे सगळे मिश्रण पाण्यांत उकळवून घ्यावे. 
५. यातील घातलेले पाणी आटून १ ग्लास होईपर्यंत पाणी मंद आचेवर उकळवून घ्यावे. 
६. पाणी थोडे आटवून घेतल्यानंतर हा चहा गाळून घ्यावा. 

डाळिंबाच्या सालीपासून बनवलेला चहा पिण्यासाठी तयार आहे. 

नवरात्रात उपवास करताना थकवा आला, गळाल्यासारखं झालं तर खा ५ पदार्थ, मिळेल इन्स्टंट एनर्जी...

डाळिंबाच्या सालीपासून बनवलेला चहा पिण्याचे फायदे :- 

१. डाळिंबाच्या सालीत जास्त प्रमाणात अँटी ऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल असतात जे हायपरपिग्मेंटेशन (त्वचेचे काळे डाग) वर उपचार करण्यास उपयुक्त ठरतात. 
२. डाळिंबाच्या सालीमुळे हृदय आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो.
३. डाळिंबाच्या सालीचा रस अँटी इंफ्लामेटरी एजंट म्हणून कार्य करतो जो जास्त वजन आणि लठ्ठपणा असणाऱ्या लोकांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारतो.


४. या चहामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून बऱ्याच अंशी सुटका मिळू शकते.
५. डाळिंबाच्या सालीपासून तयार केलेला चहा जर आपण रोज प्यायलात तर रोगप्रतिकारक शक्तीही मजबूत होईल, जेणेकरून आपण अनेक प्रकारच्या आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकतो.

Web Title: Health Benefits Of Pomegranate Peel: How To Make Pomegranate Peel Tea, Pomegranate Peel Tea Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.