Lokmat Sakhi >Food > 'श्रीखंड' हे सर्दीसाठी उत्तम औषध? बघा कसं खावं- आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात, नाक गळणं लगेच थांबेल

'श्रीखंड' हे सर्दीसाठी उत्तम औषध? बघा कसं खावं- आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात, नाक गळणं लगेच थांबेल

Health Benefits Of Shrikhand: खूप सर्दी झाली असेल तर एकदा आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात त्या पद्धतीने श्रीखंड खाऊन पाहा.. (shrikhand is the best medicine for cold and running nose as per ayurveda)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2024 01:27 PM2024-08-16T13:27:10+5:302024-08-16T15:43:25+5:30

Health Benefits Of Shrikhand: खूप सर्दी झाली असेल तर एकदा आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात त्या पद्धतीने श्रीखंड खाऊन पाहा.. (shrikhand is the best medicine for cold and running nose as per ayurveda)

health benefits of shrikhand, shrikhand is the best medicine for cold and running nose as per ayurveda, how to make shrikhnad | 'श्रीखंड' हे सर्दीसाठी उत्तम औषध? बघा कसं खावं- आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात, नाक गळणं लगेच थांबेल

'श्रीखंड' हे सर्दीसाठी उत्तम औषध? बघा कसं खावं- आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात, नाक गळणं लगेच थांबेल

Highlightsसर्दी झाली तर श्रीखंड कसं खाऊ हा विचार सोडा आणि वर सांगितल्याप्रमाणे औषधी श्रीखंड खा.. लगेच आराम वाटेल. 

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे मग घरोघरी सर्दी, नाक गळणं, सर्दीमुळे घसा दुखणं असा त्रास होणारे रुग्ण दिसत आहेत. सर्दीच्या त्रासाने जीव अगदी नकोसा होऊन जातो. हा त्रास कमी करण्यासाठी आता कडवट औषध गोळ्या घेण्यापेक्षा हा एक गोड उपाय करून पाहा.. सर्दी झाल्यावर श्रीखंड कसं खावं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल (Health Benefits Of Shrikhand). त्याच प्रश्नाचं उत्तर आयुर्वेदतज्ज्ञांनी दिलं असून कोणत्या पद्धतीने खाल्लेलं श्रीखंड सर्दी पळवून लावण्याचं उत्तम औषध ठरू शकतं, याविषयीही त्यांनी माहिती दिली आहे. (shrikhand is the best medicine for cold and running nose as per ayurveda)

 

श्रीखंड हे सर्दीवरचं उत्तम औषध

sohmkurulkr या इन्स्टाग्राम पेजवरून वैद्य सुयोग दांडेकर यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने खाल्लेलं श्रीखंड सर्दी घालविण्यासाठीचं उत्तम औषध ठरू शकतं याविषयी सांगितलं आहे.

ग्रेसफुल लुक देणारे बंद गळ्याचे ब्लाऊज! आपल्या कलेक्शनमध्ये हवेच असे ६ सुपरट्रेंडी डिझाईन्स...

ते म्हणतात की घरी तयार केलेलं श्रीखंड वापरून तुम्ही हा उपाय केला तर खूप चांगलं. पण हल्ली श्रीखंड तयार करण्याची प्रक्रिया अनेकांना किचकट आणि वेळखाऊ वाटते. त्यामुळे बाजारातून श्रीखंड विकत आणा. ते रुम टेम्परेचरवर येऊ द्या.

 

त्यानंतर साधारण अर्धा किलो श्रीखंड असेल तर त्यामध्ये १ चमचा सुंठ पावडर, चिमूटभर मीठ आणि मुगाच्या डाळीएवढा आकार असलेला भिमसेनी कापूर घाला. हे सगळे पदार्थ व्यवस्थित हलवून एकजीव करा आणि मग ते श्रीखंड खा.

किचनमध्ये बघावं तिकडे झुरळं फिरताना दिसतात? ४ सवयी स्वत:ला लावा, घरात झुरळं दिसणारच नाहीत

दही खाल्ल्याने सर्दीचा त्रास होतो. पण श्रीखंड जर वरील पद्धतीने खाल्लं तर त्यामुळे सर्दीचा त्रास खूप कमी होतो. कारण श्रीखंड करताना आणि दह्याचं श्रीखंडामध्ये रुपांतर होताना त्यातले अनेक घटक बदलतात. त्यामुळे सर्दी झाली तर श्रीखंड कसं खाऊ हा विचार सोडा आणि वर सांगितल्याप्रमाणे औषधी श्रीखंड खा.. लगेच आराम वाटेल. 


 

Web Title: health benefits of shrikhand, shrikhand is the best medicine for cold and running nose as per ayurveda, how to make shrikhnad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.