Lokmat Sakhi >Food > Health benefits of singhara :  थंडीत शिंगाडा खाल तर गॅस, एसिडिटीसह ७ आजारांपासून राहाल लांब; हे आहेत गुणकारी फायदे

Health benefits of singhara :  थंडीत शिंगाडा खाल तर गॅस, एसिडिटीसह ७ आजारांपासून राहाल लांब; हे आहेत गुणकारी फायदे

Health benefits of singhara or water : हिवाळ्यात दम्याच्या रुग्णांची समस्या वाढते. शिगाड्यांचे नियमितपणे सेवन केल्याने श्वसनाच्या समस्यांमध्ये आराम मिळतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 04:08 PM2022-11-16T16:08:51+5:302022-11-16T16:10:01+5:30

Health benefits of singhara or water : हिवाळ्यात दम्याच्या रुग्णांची समस्या वाढते. शिगाड्यांचे नियमितपणे सेवन केल्याने श्वसनाच्या समस्यांमध्ये आराम मिळतो.

Health benefits of singhara or water chestnuts in winters protect from 7 different diseases | Health benefits of singhara :  थंडीत शिंगाडा खाल तर गॅस, एसिडिटीसह ७ आजारांपासून राहाल लांब; हे आहेत गुणकारी फायदे

Health benefits of singhara :  थंडीत शिंगाडा खाल तर गॅस, एसिडिटीसह ७ आजारांपासून राहाल लांब; हे आहेत गुणकारी फायदे

हिवाळा (Winter) सुरू होताच बाजारात शिंगाडे दिसायला सुरूवात होते. (Winter Care Tips) शिंगाड्याला इंग्रजीत वॉटर चेस्ट  किंवा वॉटर कॅल्ट्रॉप म्हणतात. पोषक तत्वांनी परिपूर्ण शिंगाडा तब्येतीसाठी चांगला आहे. (Health benefits of singhara or water chestnuts in winters) यात कॅल्शियम, व्हिटामीन ए,  सी , कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटिन्ससारखी पोषक तत्व असतात. उकळून किंवा हलवा तयार करून तुम्ही शिंगाडा खाऊ शकता. शिंगाड्याचं पीठ उपवासाला वापरं जातं. याशिवाय रोजच्या जेवणातही शिंगाड्याचा समावेश केल्यानं तुम्ही आजारांपासून लांब राहू शकता. (Health benefits of singhara or water chestnuts in winters protect from 7 different diseases)

घश्याचे त्रास  लांब राहतात

अँटी-ऑक्सिडेंट गुणधर्मांनी समृद्ध असल्याने शिंगाडा घशाच्या अनेक समस्यांमध्ये आराम देण्याचे काम करते. दुखणे आणि टॉन्सिलपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही याचे सेवन करू शकता. याशिवाय निद्रानाशाच्या समस्येवरही शिंगाड्याचे सेवन करून मात करता येते.

दमा

हिवाळ्यात दम्याच्या रुग्णांची समस्या वाढते. शिगाड्यांचे नियमितपणे सेवन केल्याने श्वसनाच्या समस्यांमध्ये आराम मिळतो.

डायबिटीसच्या रुग्णांसाठी गुणकारी

डायबिटीजच्या रुग्णांसाठी शिंगाडा फायदेशीर आहे. हे मधुमेहाच्या बाबतीत शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते.

एसिडिटी, गॅस, अपचन

पोटाच्या समस्या खूप सामान्य आहेत. लोकांना अनेकदा गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होतो. याचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्यांमध्ये आराम मिळतो. यासोबतच भूक न लागण्याच्या समस्येवरही मात करता येते.

भेगा पडलेल्या टाचांना दुरूस्त करण्यासाठी

भेगा पडलेल्या टाचांना बरे करण्यासाठी शिंगाडा  प्रभावी आहे. शरीराच्या कोणत्याही भागात दुखणे किंवा सूज येणं यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही त्याची पेस्ट बनवून त्या ठिकाणी लावू शकता.

दातं आणि हाडं मजबूत होतात

कच्चा शिंगाडा खाल्ल्यानं दात आणि हाडं मजबूत राहतात. यात कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतं. याशिवाय शरीराची कम

Web Title: Health benefits of singhara or water chestnuts in winters protect from 7 different diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.