Lokmat Sakhi >Food > पावसाळ्यात खायचाच तर पांढरा कांदा खा; शेफ संजीव कपूर सांगतात ४ फायदे...

पावसाळ्यात खायचाच तर पांढरा कांदा खा; शेफ संजीव कपूर सांगतात ४ फायदे...

Celebrity Chef Sanjeev Kapoor Health Benefits of White Onion : पांढऱ्या कांद्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असून या कांद्याचा आहारात समावेश करावा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 12:48 PM2022-07-18T12:48:29+5:302022-07-18T12:53:19+5:30

Celebrity Chef Sanjeev Kapoor Health Benefits of White Onion : पांढऱ्या कांद्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असून या कांद्याचा आहारात समावेश करावा.

Health Benefits of White Onion : Eat white onion only during rainy season; Chef Sanjeev Kapoor Says 4 Benefits... | पावसाळ्यात खायचाच तर पांढरा कांदा खा; शेफ संजीव कपूर सांगतात ४ फायदे...

पावसाळ्यात खायचाच तर पांढरा कांदा खा; शेफ संजीव कपूर सांगतात ४ फायदे...

Highlightsऋतूबदलामुळे होणाऱ्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी अँटीबॅक्टेरीया फायदेशीर असतात. कांदा आपण नियमीतपणे स्वयंपाकात वापरतो, अशावेळी गुलाबी कांदा वापरण्यापेक्षा पांढरा कांदा कधीही जास्त चांगला

कांदा हा आपल्या जेवणातील अत्यावश्यक घटक असून कधी ग्रेव्हीसाठी, कधी पदार्थांला चव यावी म्हणून, तर कधी कच्चा तोंडी लावण्यासाठी आपण जेवणात आवर्जून कांदा वापरतो. पावसाळ्यात किंवा श्रावण महिन्यात शक्यतो कांदा खाऊ नये असे आपण ऐकतो. या काळात आपला अग्नी काहीसा मंद झालेला असल्याने कांदा शक्यतो कमी प्रमाणात खावा असे म्हटले जाते. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीर थंड ठेवण्यासाठी पाणी किंवा इतर पाणीदार फळांबरोबर कांद्याचे आवर्जून सेवन करावे असे आहारतज्ज्ञ सांगतात. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पांढरा कांदा हा लाल कांद्यापेक्षा आरोग्यासाठी अधिक चांगला असतो. 

(Image : Google)
(Image : Google)

पांढऱ्या कांद्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असून या कांद्याचा आहारात समावेश केल्यास शरीराला त्याचे फायदे होतात. प्रसिद्ध शेफ संजीव कपूर (Celebrity Chef Sanjeev Kapoor)  आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून फॉलोअर्सना पांढरा कांदा खाण्याचे काय फायदे होतात याविषयी माहिती देतात. ते सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून आहाराविषयीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्स आणि रेसिपींविषयी ते नेहमी काही ना काही अपडेट करत असतात. पाहूयात पांढऱ्या कांद्याचे शरीराला होणारे फायदे (4 health benefits of white onion)...

१. फायबरचा स्त्रोत

पांढऱ्या कांद्यामध्ये असणारे फायबर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. फायबर आरोग्याच्या विविध क्रिया उत्तमरितीने पार पाडण्यासाठी आवश्यक असते. पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी या फायबरचा चांगला उपयोग होतो. पोट साफ होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बॅक्टेरीयांची निर्मिती करण्याचे काम या फायबरद्वारे केले जाते. त्यामुळे नियमितपणे पोट साफ राहण्यास मदत होते. तसेच आतड्यांशी निगडित समस्या दूर करण्यासाठीही याचा अतिशय चांगला उपयोग होतो. 

पावसाळ्यात पचायला हलका आणि पौष्टिक नाश्ता करा, ३ झटपट पदार्थ-ब्रेकफास्ट मस्त

२. शरीर थंड ठेवण्यासाठी फायदेशीर

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी पांढरा कांदा अतिशय फायदेशीर असतो. काहींची प्रकृती उष्ण असते. किंवा हवेत जास्त उष्णता असली तरी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी या कांद्याचा उपयोग होतो. सनबर्नमुळे होणारी सूज कमी करण्यासाठीही या कांद्याचा चांगला उपयोग होतो. 


३. हृदयासाठी उपयुक्त 

या कांद्यामध्ये असणारे अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म शरीरातील रक्तदाब कमी करण्यास फायदेशीर ठरतात. रक्तदाब नियंत्रणात असेल तर हृदयाचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते. धमन्यांमध्ये होणाऱ्या गाठी कमी व्हाव्यात यासाठी हा कांदा खाणे फायद्याचे ठरते. ज्यांना ऐकू येण्याची समस्या आहे अशांनी आहारात पांढऱ्या कांद्याचा आवर्जून समावेश करायला हवा.

४. अंटीबॅक्टेरीयल गुणधर्म 

आपल्याला होणाऱ्या विविध प्रकारच्या इन्फेक्शनसाठी अँटी बॅक्टेरीया गुणधर्म असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश असणे आवश्यक असते. पांढऱ्या कांद्यामध्ये हे गुणधर्म चांगल्या प्रमाणात असल्याने आरोग्यासाठी हा कांदा फायदेशीर ठरतो. ऋतूबदलामुळे होणाऱ्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी पांढऱ्या कांद्यातील अँटीबॅक्टेरीया फायदेशीर ठरतात. 

Web Title: Health Benefits of White Onion : Eat white onion only during rainy season; Chef Sanjeev Kapoor Says 4 Benefits...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.