Join us  

अभिनेत्री रोशनी चोपडा सांगते, हेल्दी प्रोटीन बारची खास रेसिपी! केस आणि त्वचेसाठी वरदान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2024 10:57 AM

Health Make Delicious Sattu Dry Seeds Protein Bar At Homet to Keeps Hair Skin Healthy Actress Roshni Chopra Shares Video Recipe : Roshni Chopra Protin Bar Recipe : केस - त्वचा चांगले दिसावेत म्हणून ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा खा 'हा' हेल्दी, पौष्टिक होमेमेड प्रोटीन बार...

आजकाल चांगल्या हेल्थ आणि फिटनेससाठी प्रोटीन बार खाण्याचा नवा ट्रेंड सुरु आहे. काहीजण आपला डेली प्रोटीन इंटेक वाढवण्यासाठी दिसभरातून किमान २ ते ३ वेळा असे प्रोटीन बार खातात. बाजारात विकत मिळणारे हे प्रोटीन बार खूप महाग असतात एवढेच नव्हे तर त्यात साखरेसोबतच काही आर्टिफिशियल पदार्थांचा वापर केलेला असतो. यामुळेच बाहेर विकत मिळणारे प्रोटीन बार हे शक्यतो अनहेल्दीच असतात. यासाठीच आपण घरातील काही उपलब्ध पदार्थांचा वापर करुन घरच्याघरीच अगदी झटपट रोज खायला लागणारे प्रोटिन बार तयार करु शकतो(Roshni Chopra Protin Bar Recipe).

त्वचा आणि केसांचे अनेक प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री रोशनी चोप्रा हिने हेल्दी प्रोटीन बारची रेसिपी नुकतीच इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. रोशनी स्वतःच्या हेल्दी त्वचा आणि केसांसाठी या होममेड प्रोटीन बारचा समावेश न चुकता आपल्या डाएटमध्ये करते. या प्रोटीन बारमध्ये असणारे सुपर हेल्दी सीड्स, सातूचे पीठ यांसारख्या इतर अनेक पदार्थांमुळे हा बार आपल्या आरिग्यासाठी हेल्दी आणि पौष्टिक ठरतो. केस आणि त्वचेच्या अनेक समस्यांनी आजकाल प्रत्येजण कमी - अधिक प्रमाणात त्रस्त असल्याचे दिसून येते. याचप्रमाणे स्किन आणि हेअर प्रॉब्लेम्स कमी करण्यासाठी महागड्या केमिकल्सयुक्त प्रॉडक्सपेक्षा घरगुती पद्धतीने तयार केलेला होममेड सुपरहेल्दी प्रोटीन बार खाणे केव्हाही चांगलेच. केस आणि त्वचेसाठी वरदान ठरणारा हा प्रोटीन बार कसा तयार करायचा याची सोपी रेसिपी पाहूयात(Health Make Delicious Sattu Dry Seeds Protein Bar At Homet to Keeps Hair Skin Healthy Actress Roshni Chopra Shares Video Recipe).

साहित्य :- 

१. अळशीच्या बिया - १ टेबलस्पून २. सूर्यफुलाच्या बिया - १ टेबलस्पून ३. चिया सीड्स - १ टेबलस्पून ४. पांढरे तीळ - १ टेबलस्पून ५. सातूचे पीठ - २ कप६. पीनट बटर - २ ते ३ टेबलस्पून ७. खजूर - २ ते ३ (बिया काढून घेतलेले) 

नवरात्र उपवास स्पेशल : प्या ‘ही’ उपवास स्मूदी-पोटही भरेल आणि डिहायड्रेशनही होणार नाही...

नवरात्र स्पेशल : राजगिऱ्याचा हलवा करा फक्त १० मिनिटांत, १ कप पिठाचा पोटभर खाऊ!

कृती :- 

१. एका मोठ्या कढईमध्ये अळशीच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, चिया सीड्स, पांढरे तीळ एकत्रित करुन कोरडे भाजून घ्यावेत. सगळे जिन्नस ४ ते ५ मिनिटे कोरडे भाजून घ्यावेत. २. आता हे सगळे जिन्नस कोरडे भाजल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून थोडे थंड होऊ द्यावेत. ३. सगळे भाजून घेतलेले जिन्नस एका मिक्सरजारमध्ये घालून त्याची बारीक पूड करुन घ्यावी. ४. आता एका पॅनमध्ये सातूचे पीठ घालून ते २ ते ४ मिनिटे कोरडे भाजून घ्यावे. 

उडप्याकडे मिळते तशी परफेक्ट कॉफी करण्यासाठी दुधात केव्हा - किती चमचे कॉफी घालावी, पहा खास सिक्रेट...

चव साबुदाणा वड्याचीच पण खायचे मात्र साबुदाणा आप्पे-उपवासाला खा कमी तेलातील चमचमीत पदार्थ...

५. मिक्सरजारमध्ये बिया काढून घेतलेले खजूर आणि पीनट बटर घेऊन त्याची एकत्रित थोडी मध्यम कंन्सिस्टंसीची पेस्ट तयार करुन घ्यावी.६. आता एका मोठ्या डिशमध्ये भाजून घेतलेले सातूचे पीठ, सगळ्या बियांची पावडर आणि खजूर व पीनट बटर यांची पेस्ट हे सगळे जिन्नस एकत्रित करून हातांनी व्यवस्थित दाबून घेऊन मिश्रण एकजीव करुन घ्यावे. ७. आता एका मोल्डमध्ये किंवा डब्यांत बटर पेपर घालून त्यावर हे मिश्रण ओतून हाताने हलकेच दाब देत मिश्रण सेट करून घ्यावे. ८. थोड्यावेळाने सुरीच्या मदतीने या मिश्रणाच्या वड्या कापून हे प्रोटीन बार खाण्यासाठी सर्व्ह करावेत. 

अशाप्रकारे घरच्याघरीच झटपट आणि हेल्दी प्रोटीन बार खाण्यासाठी तयार आहे. रोज एक प्रोटीन बार खाल्ल्याने केस आणि त्वचेशी संबंधित अनेक प्रॉब्लेम्स कमी होण्यास मदत मिळते.

टॅग्स :अन्नपाककृतीत्वचेची काळजीकेसांची काळजी