तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी सकस आहार खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि काम करण्याची ताकद मिळते. आजकालच्या या धावपळीच्या जीवनात लोकांना व्यवस्थित बसून जेवायलाही वेळ मिळत नाही. कामातून मोकळा वेळ नसल्याने ते घाईघाईने जेवतात आणि उठतात.
काही लोक दिवसातून अनेक वेळा कमी प्रमाणात खातात, तर काहींना एकाच वेळी जास्त खायला आवडतं. अशा परिस्थितीत, प्रश्न उद्भवतो की, खाण्याची कोणती पद्धत (स्मॉल मील विरुद्ध लार्ज मील) अधिक आरोग्यदायी आहे. आहारतज्ज्ञांकडून ते जाणून घेऊया...
कमी प्रमाणात वारंवार खाण्याचे फायदे
वजन नियंत्रण
कमी पण वारंवार खाल्ल्याने शरीरातील मेटाबॉलिज्म नेहमीच सक्रिय राहतं. वारंवार खाल्ल्याने शरीराला पचायला कमी वेळ मिळतो, त्यामुळे उर्जेची पातळी कायम राहते. यामुळे कॅलरीज चांगल्या प्रकारे बर्न होण्यास मदत होते आणि वजन कमी होते.
रक्तातील साखरेचं नियंत्रण
कमी खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखर अचानक वाढत नाही. मधुमेहाच्या रुग्णांसाठी तेे फायदेशीर आहे.
पचनक्रिया चांगली राहते
थोड्या प्रमाणात वारंवार खाल्ल्याने शरीराच्या पचनसंस्थेला आराम मिळतो. तो अन्न चांगले पचवू शकतो. यामुळे मेटाबॉलिज्म देखील मजबूत राहतं आणि शरीर सक्रिय राहतं.
जास्त खाणं टाळा
थोडं थोडं वारंवार खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहते. यामुळे अति खाणं टाळता येतं आणि लठ्ठपणासारख्या समस्या उद्भवत नाहीत. जेव्हा आहारात फक्त निरोगी पदार्थांचा समावेश केला जातो तेव्हाच ही पद्धत फायदेशीर ठरते.
एकाच वेळी पोटभर जेवण करण्याचे फायदे
- जे लोक पोटभर जेवण करतात ते दिवसातून दोन किंवा तीन वेळा खातात. दिवसभर काम करणारे लोक बहुतेकदा ही पद्धत अवलंबतात जेणेकरून त्यांच्या शरीराची ऊर्जा टिकून राहते आणि त्यांचा वेळ देखील वाचतो.
- जे लोक एकाच वेळी जास्त खातात ते वारंवार जेवत नाहीत, यामुळे त्यांच्या पचनसंस्थेला अन्न पचवण्यासाठी जास्त वेळ मिळतो आणि त्यांचे पोटही निरोगी राहते.
जास्त खाण्याचे तोटे
- एकाच वेळी जास्त अन्न खाल्ल्याने पचनसंस्थेवर ताण येतो आणि त्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
- जास्त खाल्ल्यानंतर रक्तातील साखर अचानक वाढू शकते.
- जास्त खाणाऱ्या लोकांचे वजन लवकर वाढतं.
- एकाच वेळी खूप जास्त किंवा कमी खाणं
न्यूट्रिशियनिस्ट्स आणि आहारतज्ञांच्या मते, कमी पण वारंवार खाणं हा अधिक फायदेशीर दृष्टिकोन आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही थोडं थोडं जेवण करून भूक आणि कॅलरीज दोन्ही नियंत्रित करू शकता. लहान जेवणामुळे मेटाबॉलिज्म वाढतं, ज्यामुळे कॅलरीज बर्न होतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी देखील नियंत्रणात राहते. म्हणूनच जे लोक अशा प्रकारे अन्न खातात ते अधिक निरोगी आणि तंदुरुस्त राहतात.