Lokmat Sakhi >Food > रोज सकाळी चहा लागतोच? मग चहा पिताना फक्त 'या' गोष्टी लक्षात ठेवा; आजारपण नेहमी राहील लांब

रोज सकाळी चहा लागतोच? मग चहा पिताना फक्त 'या' गोष्टी लक्षात ठेवा; आजारपण नेहमी राहील लांब

Tea benefits and side effects : चहा पिऊन तुमच्या दिवसाची चांगली सुरूवात होत असली तरी चहाचे अतिसेवन हृदयासाठी नुकसानकारक ठरू शकतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 07:22 PM2021-09-17T19:22:55+5:302021-09-17T19:39:02+5:30

Tea benefits and side effects : चहा पिऊन तुमच्या दिवसाची चांगली सुरूवात होत असली तरी चहाचे अतिसेवन हृदयासाठी नुकसानकारक ठरू शकतं.

Health Tips : Tea benefits and side effects | रोज सकाळी चहा लागतोच? मग चहा पिताना फक्त 'या' गोष्टी लक्षात ठेवा; आजारपण नेहमी राहील लांब

रोज सकाळी चहा लागतोच? मग चहा पिताना फक्त 'या' गोष्टी लक्षात ठेवा; आजारपण नेहमी राहील लांब

सगळ्यांना सकाळी चहा, कॉफी पिण्याची सवय असते. अधिकाधिक लोक आपल्या सकाळची सुरूवात चहानं करतात. एक कप चहात २० ते ६० मिलिग्राम कॅफेन असते. कॅफेन हेल्थसाठी चांगले  ठरत नाही. म्हणून चहाच्या सेवनाबाबत काही गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे.  

चहा पिऊन तुमच्या दिवसाची चांगली सुरूवात होत असली तरी चहाचे अतिसेवन हृदयासाठी नुकसानकारक ठरू शकतं.  चहा जास्त प्यायल्यानं हृदयाचे आजार वाढू शकतात. दिवसातून तीन ते चारवेळा चहा प्यायल्यानं एंटीबायोटीक औषधांचा परिणाम कमी होतो. म्हणून कोणत्याही आजारावरील औषध सुरू असतील तर चहा घेणं टाळा.

आतड्यांवर वाईट परिणाम

चहा जास्त प्रमाणात प्यायल्यानं आतड्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.  चहा चवीला तुरट असल्यामुळे तो बद्धकोष्ठता निर्माण करतो. काहींना चहा न प्यायल्यास शौचाला होत नाही हे सवयीमुळे होते. शौचाचा वेग निर्माण करणे हे चहाचे काम नव्हे. चहा रक्ताची आम्लता वाढवतो. नियमित चहा पिण्याने हाडे ठिसूळ होतात, रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो आणि आम्लपित्ताचा त्रास वाढतो.

लठ्ठपणा वाढू शकतो

चहा सतत प्यायल्याने लठ्ठपणाची समस्या सुद्धा उद्भवते. कारण दुधातील फॅट्स आणि साखर या पदार्थांचा आहारात जास्त समावेश असल्यामुळे वजन वाढू शकतं. याशिवाय सतत चहा प्यायल्यामुळे दात पिवळट दिसू लागतात. त्यामुळे तुमचं इंप्रेशन खराब होऊ शकतं. म्हणून दिवसातून जास्त चहा पिणं टाळा.

सकाळी चहाचं सेवन कितपत योग्य?

सकाळी चहाचं सेवन करण्याची सवय सगळ्यांनाच असते. पण सकाळी रिकाम्यापोटी चहा प्यायल्याने एसिडीटीची समस्या उद्भवू शकते. भूक मरते, मेटाबोलिझ्मही मंदावतं. म्हणून उठल्यानंतर आधी गरम पाण्याचं सेवन करा. म्हणजे तुमची पचनक्रिया चांगली राहते. त्यानंतर नाष्त्याला काही पौष्टीक पदार्थ खाल्यानंतर चहाचं सेवन करा.

'ही' आहेत कॅन्सरची सुरूवातीची लक्षणं; वेळीच लक्ष दिल्यास टळेल भविष्यात उद्भवणारा मोठा धोका

रात्रभर शरीराला पाणी मिळत नाही, त्यामुळे शरीर डिहायड्रेट झालेलं असतं. अशावेळी तुम्ही चहा प्याल तर डिहायड्रेशनची समस्या वाढू शकते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी रिकाम्या पोटी 2 ग्लास पाणी प्या. एक किंवा दोनपेक्षा जास्त वेळा चहा पित असाल, तर तुमची भूक मरते, कारण यामध्ये कॅफिने भरपूर प्रमाणात असतं.शिवाय तुमची ऊर्जाही कमी होते आणि झोपेवर परिणाम होऊ शकतो.

अरे व्वा! फक्त ७ दिवसात वाढलेली शुगर लेव्हल कमी करतो 'हा' पदार्थ; संशोधनातून खुलासा

चहा जास्त उकळून प्यायल्यानेही चहातील निकोटिनामाइडचं प्रमाण वाढतं, जे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं नाही. भरपूर वेळ आधी बनवलेला चहा तुम्ही पुन्हा गरम करून पित असाल, तर असा चहा विषापेक्षा कमी नाही. त्यामुळे ताजा चहा प्या. तयार केल्यानंतर चहा पुन्हा गरम करण्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे चहाची चव आणि सुगंध पूर्णपणे नाहीसा होतो. एवढेच नाही तर जेव्हा तुम्ही चहा पुन्हा गरम करता तेव्हा ते चहाच्या आत असलेले पोषक घटक पूर्णपणे नष्ट होतात.

जर तुम्ही चहा दीर्घकाळ म्हणजेच सुमारे 4 तास तसाच ठेवला. तर या काळात अनेक जीवाणू आणि जंतू चहामध्ये प्रवेश करतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही चहा गरम केलात, तर ते केवळ चव बदलत नाही. तर चहात असलेले सर्व फायदेशीर पोषक बाहेर फेकले जातात.

बहुतेक  लोक दुधाच्या चहाचे सेवन करतात. ज्यामध्ये सूक्ष्मजीव लवकर विकसित होण्याचा धोका असतो. जर तुम्ही गरम हर्बल चहा पित असाल तर त्याच्या आत असलेले सर्व गुणधर्म नाहिसे होतात. म्हणून चहा पहिल्यांदा बनवल्यानंतर लगेच  प्या.

Web Title: Health Tips : Tea benefits and side effects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.