Lokmat Sakhi >Food > डॉ.श्रीराम नेने सांगतात खजूराच्या लाडूंची स्पेशल -हेल्दी रेसिपी, थंडीत ऊर्जा मिळण्यासाठी परफेक्ट एनर्जी बूस्टर

डॉ.श्रीराम नेने सांगतात खजूराच्या लाडूंची स्पेशल -हेल्दी रेसिपी, थंडीत ऊर्जा मिळण्यासाठी परफेक्ट एनर्जी बूस्टर

Healthy and Easy Khajur Dates ladoo Recipe by Dr. Shriram Nene : पाहूयात अगदी १० मिनीटांत होणाऱ्या पौष्टीक लाडूंची रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2023 12:20 PM2023-11-16T12:20:42+5:302023-11-16T12:22:53+5:30

Healthy and Easy Khajur Dates ladoo Recipe by Dr. Shriram Nene : पाहूयात अगदी १० मिनीटांत होणाऱ्या पौष्टीक लाडूंची रेसिपी...

Healthy and Easy Khajur Dates ladoo Recipe by Dr. Shriram Nene : Dr. Sriram Nene shares a special-healthy recipe of Khajur Ladoo, a perfect energy booster for cold weather. | डॉ.श्रीराम नेने सांगतात खजूराच्या लाडूंची स्पेशल -हेल्दी रेसिपी, थंडीत ऊर्जा मिळण्यासाठी परफेक्ट एनर्जी बूस्टर

डॉ.श्रीराम नेने सांगतात खजूराच्या लाडूंची स्पेशल -हेल्दी रेसिपी, थंडीत ऊर्जा मिळण्यासाठी परफेक्ट एनर्जी बूस्टर

लाडू म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर बेसनाचे, रव्याचे नाहीतर मोतीचुराचे लाडू येतात. नुकतीच दिवाळी झाल्याने अनेकांकडे अजूनही हे लाडू भरपूर खाल्ले जात असतील. पण थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा देणारे आणि शरीराची ताकद टिकवून ठेवणारे लाडू म्हणजे पौष्टीक लाडू. या काळात आपण घरी आवर्जून डिंकाचे, सुकामेव्याचे लाडू करतो नाहीतर विकत आणतो. पण असे लाडू विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी झटपट केले तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच ते आवडीने खाऊ शकतात. दिवाळीत बरेचदा अनेकांना गिफ्ट म्हणून सुकामेवा मिळालेला असतो. त्याचा वापर करुन हे पौष्टीक लाडू केले तर?

हे लाडू करायला अतिशय सोपे असून ते शरीरासाठी अतिशय फायदेशीर असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी आवर्जून खायला हवेत. प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने हे फूडी असल्याने ते कायमच आपल्या सोशल मीडियावरुन विविध पारंपरिक रेसिपीज शेअर करत असतात. इतकेच नाही तर पेशाने डॉक्टर असल्याने डॉ. नेने आरोग्याविषयीही बऱ्याच महत्त्वाच्या टिप्स शेअर करुन नेटीझन्सना उपयुक्त माहिती देत असतात. डॉ. नेने यांनी नुकतीच खजूराच्या लाडूंची एक खास रेसिपी शेअर केली असून हे लाडू कसे करायचे हे त्यांनी यामध्ये अतिशय सोप्या शब्दांत सांगण्याचा प्रयत्न केला आहे (Healthy and Easy  Khajur Dates ladoo Recipe by Dr. Shriram Nene) .  

साहित्य - 

१. खजूर –  बिया नसलेले १२ ते १५ 

२. बदाम -  अर्धी वाटी 

३. काजू - अर्धी वाटी

४. मनुके - २ ते ३ चमचे 

५. तूप –  ३ चमचे 

६. खोबऱ्याचा कीस – अर्धी वाटी 

७. खसखस – २ चमचे  

कृती - 

१. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये २ चमचे तूप घालून त्यामध्ये काजू आणि बदाम चांगले लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे. 

२. काजू-बदाम थोडे गार करायचे आणि मिक्सरच्या भांड्यात घालून त्याची पूड करुन घ्यायची.

३. खजूराचे तुकडे मिक्सरमधून फिरवून तोही चांगला बारीक करुन घ्यायचा. 

४. मनुक्यांचेही बारीक काप करुन घ्यायचे.

५. काजू, बदाम पूड, मनुक्यांचे तुकडे आणि खजूराची पेस्ट हे सगळे बाऊलमध्ये एकत्र करायचे. 

६. यामध्ये सुकं खोबरं आणि खसखस घालून हे सगळे चांगले एकत्र करायचे. 

७. त्यानंतर हाताला तूप लावून या मिश्रणाचे लाडू तयार करायचे आणि हे लाडू थंडीच्या दिवसांत नियमित खायचे. 

लाडू म्हटले की भरपूर साखर नाहीतर गूळ वापरावा लागतो. पण या लाडूमध्ये साखरेचा वापर नसून केवळ नैसर्गिक गोड असलेला खजूर आणि मनुके वापरलेले असल्याने हे लाडू आरोग्यासाठी फायदेशीर असतात.  
 

Web Title: Healthy and Easy Khajur Dates ladoo Recipe by Dr. Shriram Nene : Dr. Sriram Nene shares a special-healthy recipe of Khajur Ladoo, a perfect energy booster for cold weather.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.