Join us

कपभर हिरव्या मुगाच्या डाळीचा करा मऊ-लुसलुशीत, जाळीदार ढोकळा, पचायला एकदम हलका, सोपी रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2025 13:47 IST

Green Moong Dhokla recipe: Healthy Indian snacks: Moong dal dhokla: Protein-packed dhokla: Gluten-free dhokla: Low-calorie snack ideas: Dhokla with green moong dal: food: recipe: Healthy fermented snacks: Steamed dhokla: High-protein Indian recipes: जर आपल्यालाही मऊ लुसलुशीत घरीच जाळीदार हेल्दी ढोकळा ट्राय करायचा असेल तर हिरव्या मुगाच्या डाळीपासून आपण बनवू शकतो.

रोज सकाळी नाश्त्याला काय बनवायचं असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला की, नवीन काही तरी खाण्याची इच्छा होते. (High-protein Indian recipes)सकाळचा नाश्ता हा भरपूर हेल्दी आणि पौष्टिक असायला हवा असं म्हटलं जातं. अधिक प्रमाणात खाल्ल्याने आपल्याला झोप येते किंवा आळस चढतो. अशावेळी हलका पण प्रोटिनयुक्त असणारे पदार्थ खाण्याला सल्ला नेहमी दिला जातो. (Healthy Indian snacks)

बाजारातला विकत मिळणारा ढोकळा अनेकदा आपण खाल्लाच असेल. हा ढोकळा अनेकदा घशात अडकतो किंवा खाल्ल्यानंतर पोट फुगल्यासारखे वाटते. (Low-calorie snack ideas)बाहेरचे पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी हेल्दी नसतात. जर आपल्यालाही मऊ लुसलुशीत घरीच जाळीदार हेल्दी ढोकळा ट्राय करायचा असेल तर हिरव्या मुगाच्या डाळीपासून आपण बनवू शकतो. (Healthy fermented snacks) यामुळे शरीराला चांगल्या प्रकारे प्रथिने आणि आयर्न मिळेल. घरच्या घरी करा कपभर हिरव्या मुगाच्या डाळीचा ढोकळा. 

वर्षभर टिकणारा वाळवणाचा पदार्थ, पोह्याचे मिरगुंड, पचायला अगदी हलके आणि चविष्ट

साहित्य 

हिरवे मूग - १ कप कोथिंबीर - आवडीनुसार हिरव्या मिरच्या - २ आले - २ इंच दही - अर्धा कप रवा - १ वाटी मीठ - चवीनुसार बेकिंग सोडा - १ चमचा लाल मिरची पावडर 

फोडणीसाठी कढीपत्ता, तेल आणि तीळ, मिरची, ओले खोबरे 

 

कृती 1. सगळ्यात आधी भिजवलेले हिरवे मूग, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आले आणि दही मिक्समध्ये चांगले वाटून घ्या. 

2. नंतर यात रवा, चवीनुसार मीठ आणि बेकिंग सोडा घालून मिश्रण एकजीव करा. तयार मिश्रण १० ते १५ मिनिटे झाकून घ्या. 

3. ढोकळा बनवण्याच्या पात्राला तेलाने ग्रीस करुन त्यात मिश्रण घाला. वरुन लाल मिरची पावडर आणि कोथिंबीर घाला. 

4. ढोकळ्याच्या भांड्यात वाफेवर ठेवून चांगले शिजवून घ्या. थंड झाल्यानंतर त्याचे वडीसारखे काप करा. 

5. फोडणी देण्यासाठी तेलात कढीपत्ता, मिरची आणि तीळ टाका. तयार वडीवर वरुन फोडणी द्या. ओले खोबरे पसरवून घ्या. 

6. स्वादिष्ट आणि पौष्टिक, मऊ-लुसलुशीत, जाळीदार हिरव्या मुगाच्या डाळीचा ढोकळा तयार होईल. 

 

टॅग्स :अन्नपाककृती 2023