Join us  

शिळ्या भाकरीची करा झणझणीत ‘फोडणीची भाकरी’! -खा चविष्ट गरमागरम पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2023 11:54 AM

Healthy bhakri cha chivda | Indian phodnichi bhakri : भाकरीचा कुस्करा तर आपण करतोच, ही फोडणीची भाकरीही करुन पाहा

प्रत्येक घरात अनेकदा जेवण उरतेच. मग ते भात असो, चपाती, भाजी किंवा भाकरी (Bhakri). अनेक लोकं शिळं अन्न खाण्यास नकार देतात. अशा वेळी अन्नाची नासाडी तर होतेच, शिवाय शिळ्या अन्नाचं करायचं काय? असा प्रश्न निर्माण होतो. भात उरला तर आपण फोडणीचा भात, उरलेल्या पोळ्यांचा चिवडा किंवा त्यात तूप-गुळ घालून लाडू तयार करतो. पण शिळ्या भाकऱ्यांचं करायचं काय? शिळ्या भाकऱ्या लगेच कडक होतात. ज्यामुळे बरेच लोकं खाताना नाकं मुरडतात.

जर आपल्याला उरलेल्या भाकऱ्यांचं काहीतरी स्पेशल आणि हटके डिश करायची असेल तर, फोडणीची भाकरी ही रेसिपी ट्राय करून पाहा. फोडणीची भाकरी कमी साहित्यात झटपट तयार होते. नाश्त्यासाठी देखील आपण फोडणीची भाकरी ही रेसिपी तयार करून मुलांना देऊ शकता(Healthy bhakri cha chivda | Indian phodnichi bhakri).

फोडणीची भाकरी करण्यासाठी लागणारं साहित्य

भाकरी

तेल

जिरं

मोहरी

बेसनाच्या भजींनी त्रास होतो? मग करा कपभर रव्याची भजी, अशी कुरकुरीत भजी तुम्ही खाल्ली नसतील..

मीठ

कांदा

कांदा-लसूण मसाला

कडीपत्ता

कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये पाणी घ्या, त्यात हाताने भाकरीचे लहान तुकडे करून घाला. ५ मिनिटांसाठी पाण्यात भाकरीचे तुकडे भिजत ठेवा. ५ मिनिटानंतर भाकरीतील पाणी काढून घ्या. एका कढईत २ चमचे तेल घालून गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात एक चमचा मोहरी, एक चमचा जिरं, २ बारीक चिरलेला कांदा, कडीपत्ता घालून भाजून घ्या. कांदा लालसर झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, चिमुटभर हळद व भिजलेली भाकरी घालून चमच्याने मिक्स करा.

हात न लावता गरमागरम बटाटे सोलण्याची हटके ट्रिक, बटाटे सोलूनही निघतील-मॅशही होतील

नंतर त्यात २ चमचे कांदा - लसूण मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर व त्यावर थोडे हाताने पाणी शिंपडून झाकण ठेवा. २ मिनिटांसाठी वाफेवर भाकरी शिजवून घ्या. २ मिनिटानंतर पुन्हा चमच्याने ढवळून एका बाऊलमध्ये फोडणीची भाकरी सर्व्ह करा. अशा प्रकारे फोडणीची भाकरी खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स