नाश्ता हे आपल्या आहाराचा मुख्य भाग. पोटभर हेल्दी नाश्ता खाल्ल्याने दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. शिवाय अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतात. नाश्त्यामध्ये बरेच जण उपमा, पोहा, इडली, डोसा, मेदू वडा खाण्यास पसंती दर्शवतात. नाश्त्याला अनेक लोकं स्पंजी-फ्लफी इडली खातात. त्यासोबत सांबार आणि चटणी अप्रतिम लागते.
डाळ-तांदळाची इडली आपण खाल्लीच असेल, पण कधी नाचणीची पौष्टीक इडली ट्राय करून पाहिली आहे का? नाचणी खाण्याचे अनेक फायदे आहेत. नाचणीमध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे प्रथिने, कार्बोदके, कॅल्शिअम आणि फॉस्फरस आढळते. नाचणीचे अनेक पदार्थ केले जातात. नाचणीची भाकरी, आंबील, धिरडे आपण खाल्लीच असेल. पण कधी नाचणीची इडली करून पाहिली आहे का? नाचणीची इडली कशी तयार करायची पाहूयात(Healthy Breakfast Recipe - Super soft Ragi Idli).
नाचणीची इडली करण्यासाठी लागणारं साहित्य
नाचणी
तांदूळ
उडीद डाळ
तळकट म्हणून शंकरपाळे खाणं टाळताय? तेलाचा एक थेंबही न वापरता-कढईत तयार करा खुसखुशीत शंकरपाळे
मेथी दाणे
पोहे
मीठ
कृती
सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये दीड वाटी नाचणी आणि एक कप तांदूळ घालून मिक्स करा. मग त्यात एक कप पाणी घालून नाचणी-तांदूळ धुवून घ्या. नंतर दोन कप पाणी घालून तांदूळ नाचणी भिजत ठेवा. दुसऱ्या एका बाऊलमध्ये एक वाटी उडीद डाळ, एक चमचा मेथी दाणे व पाणी घालून रात्रभर किंवा ५ ते ६ तासांसाठी भिजत ठेवा. एका बाऊलमध्ये भिजलेले पोहे घ्या.
साहित्य भिजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात उडीद डाळ आणि पोहे घेऊन त्याची पेस्ट तयार करा. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात नाचणी-तांदुळाची देखील पेस्ट तयार करून घ्या. तयार पेस्ट डाळीच्या पेस्टमध्ये मिक्स करा. नंतर त्यावर ८ ते १० तासांसाठी झाकण ठेवा, जेणेकरून पीठ छान आंबेल.
८ ते १० तासानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. स्टीमरमध्ये पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. इडली पात्रावर ब्रशने तेल लावून ग्रीस करा. नंतर त्यावर चमच्याने पीठ सोडा, व इडल्या १५ ते २० मिनिटांसाठी वाफवून घ्या. अशा प्रकारे नाचणीची पौष्टीक इडली खाण्यासाठी रेडी.