Join us  

वाफाळलेल्या भाज्या खाऊन कंटाळलात? खा चटकदार वेट लॉस चाट, वजन कमी-पोटही होईल सपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2023 6:00 PM

Healthy Chaat Recipes For Weight Loss : अनेक जण वजन वाढण्याच्या भीतीने चाट खाणं टाळतात, जर आपण या पद्धतीने चाट करून खाल्ल्यास नक्कीच फरक दिसेल..

अनेकदा व्यायाम आणि डाएटिंग करूनही वजन कमी (Weight Loss) होत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. पहिले म्हणजे इस्ट्रोजेनचा अतिरेक आणि इन्शुलीन रेजिस्टेंस. ज्यामुळे वजन तर वाढतेच, शिवाय गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. वजन कमी करताना आपण बऱ्याच गोष्टी करतो. शिवाय आवडते मसालेदार-क्रिस्पी पदार्थ खाणं टाळून, वाफाळलेल्या भाज्या खातो. पण तरीही आपल्याला हवा तसा फरक लवकर दिसून येत नाही.

जर आपल्याला वजन कमी करायचं असेल, शिवाय बेली फॅटही कमी करायचे असेल तर, घरगुती चाट तयार करून खा, यामुळे नक्कीच वजन कमी होईल. पण चाटचा कोणता प्रकार खाल्ल्याने वजन कमी होईल? याची माहिती आहारतज्ज्ञ मनप्रीत यांनी दिली आहे(Healthy Chaat Recipes For Weight Loss).

आहारतज्ज्ञांच्या मते, 'हार्मोनल असंतुलनामुळे पोटाची आणि शरीराची चरबी लवकर कमी होत नाही. यासाठी आपण आहार आणि व्यायामकडे विशेष लक्ष देतो. जर आपल्याला वाफाळलेल्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर, काळे चणे आणि रताळ्याचा वापर करून चटकदार चाट तयार करा. हा पदार्थ खाल्ल्याने इन्शुलीनची सेन्सिटिव्हिटी सुधारते आणि इस्ट्रोजेनचा अतिरेक होत नाही.'

वेट लॉस चाट करण्यासाठी लागणारं साहित्य

रताळे

काळे चणे

काकडी

कांदा

टोमॅटो

कोथिंबीरीची चटणी

हिवाळ्यात खा कणकेचे पौष्टिक लाडू, पंजाबी पिन्नीचा पाहा भन्नाट प्रकार, लाडू टिकतील महिनाभर

सूर्यफुलाच्या बिया

भोपळ्याच्या बिया

कृती

सर्वप्रथम, रताळ्याचे तुकडे आणि काळे चणे शिजवून घ्या. उकडलेले चणे आणि आणि शिजलेले रताळे थंड करण्यासाठी एका भांड्यात ठेवा. नंतर त्यात बाकीचे मासाले आणि साहित्य घालून मिक्स करा. अशा प्रकारे वेट लॉस चाट खाण्यासाठी रेडी. आपण हा चाट दुपारच्या वेळेस खाऊ शकता.

कडू मेथी कशी ओळखावी? कोथिंबीर जास्त काळ फ्रेश ठेवण्यासाठी काय करावे? पाहा निवडण्याची सोपी ट्रिक

रताळे आणि काळे चणे खाण्याचे फायदे

रताळ्यामध्ये व्हिटॅमिन बी ६ असते. जे इस्ट्रोजेन डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करते. तर, काळे चणे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. त्यात प्रोटीनचे प्रमाणही जास्त असते. ज्यामुळे लवकर भूक लागत नाही. शिवाय शरीराला फायबर देखील प्रदान करते.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स