थंडी पडू लागल्याने आता वातावरणात बऱ्यापैकी गारठा जाणवू लागला आहे. दिवसेंदिवस आता थंडी फार मोठ्या प्रमाणांत वाढत जात आहे. थंडीत वातावरणातील गारठ्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन आपण वारंवार आजारी पडण्याची शक्यता असते. हिवाळ्यात सर्दी, खोकला, ताप अशा आरोग्याचा लहान - मोठ्या कुरबुरी सतत सतावत असतात. थंडीमुळे आजारी पडू नये म्हणून आहाराबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. आपल्या आहाराची योग्य काळजी घेतल्यास आपण कडाक्याच्या थंडीतही अगदी फिट राहू शकतो(Healthy Drinks To Stay Warm & Healthy In Winter Season).
हिवाळ्यात थंडी पासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला उबेची आणि उष्णतेची गरज असते. यासाठी आपण शरीरात उष्णता निर्माण व्हावी म्हणून उष्ण पदार्थ खाण्यावर अधिक भर देतो. थंडीच्या दिवसात तुमचे शरीर उबदार ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या डेली रुटीनमध्ये काही आरोग्यदायी पेयांचा समावेश करू शकता. आपल्या शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ खाण्यासोबतच आपण काही औषधी पेय देखील पिऊ शकतो. हिवाळ्यात अशी हेल्दी पेय प्यायल्याने शरीरात थंडीपासून बचाव करण्यासाठी उष्णता तर निर्माण होईल सोबतच रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढेल. यासाठीच हिवाळ्यात चहा सोबतच इतर कोणत्या प्रकारची पेय प्यावीत ते पाहूयात(Try These 6 Healthy DrinksTo Stay Warm In Winter).
हिवाळ्यात नक्की प्या...
१. बदाम दूध :- हिवाळ्यात बदाम घालून दूध पिणे खूपच आरोग्यदायी ठरु शकते. दूध आणि बदामामध्ये असलेले पोषक तत्व तुम्हाला अनेक फायदे देऊ शकतात. हे पेय बनवण्यासाठी तुम्हाला दुधात बदाम पावडर किंवा बदामाचे पातळ काप घालून दूध उकळवून घ्यावे लागेल. हे दूध अधिक चवदार करण्यासाठी तुम्ही त्यात केशरही घालू शकता. बदाम घातलेले दूध पिऊन तुमच्या शरीरात ऊब निर्माण होईल.
ऐन थंडीत ब्लँकेट-चादरी-गोधड्या पडल्या गार? ३ ट्रिक्स, गारठा गायब-पांघरुण वाटेल उबदार...
२. ग्रीन टी :- कडाक्याच्या थंडीत आपण गरमागरम ग्रीन टी देखील पिऊ शकता. अँटिऑक्सिडंट्ससाठी हेल्दी ड्रिंक्समध्ये ग्रीन टी सर्वोत्तम मानली जाते. थंडीत आपण बरेचदा पाणी कमी पितो किंवा आपल्याला कमी प्रमाणांत तहान लागते. यासाठी शरीरातील पेशी हायड्रेटेड ठेवण्यासाठी ग्रीन टी पिणे उपयुक्त ठरेल. याशिवाय ग्रीन टी पिऊन वजनही नियंत्रणात ठेवता येते. मधुमेह, अल्झायमर आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींसाठी हिवाळ्यात ग्रीन टी पिणे फायदेशीर ठरु शकते.
३. आल्याचा चहा :- आलं हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. आल्यामुळे हिवाळ्यात होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या अॅलर्जीपासून संरक्षण केले जाते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत आल्याचा चहा जरूर प्यावा. याशिवाय आले शरीराला डिटॉक्सिफाय करते आणि उबदारपणा देते.
४. हळदीचे दूध :- हळद भारतातील सर्व घरांमध्ये असतेच. कोणी आजारी पडल्यास हळदीचे दूध नक्कीच दिले जाते, जे खूप फायदेशीर असते. हळदीचे दूध तुम्हाला उबदार ठेवण्यासोबतच, हे पेय रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते. हळदीचे दूध पिऊन बहुतेक सगळ्यांनाच हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी खोकल्यापासून संरक्षण केले जाते.
खाऊन तर पाहा आवळा आणि ओल्या हळदीचा आंबटगोड ठेचा, हिवाळ्यातल्या जेवणाची वाढते रंगत...
५. हेल्दी घरगुती काढा :- जर तुम्हाला हिवाळ्यात आजारांपासून स्वतःचे संरक्षण करायचे असेल तर वेलची, दालचिनी, आले, काळी मिरी आणि तुळशीची पाने पाण्यात एकत्रित मिसळून उकळा. नंतर हा काढा चहासारखा गाळून प्यावा. यामुळे तुम्हाला उबदारपणा तर मिळेलच, शिवाय तुमच्या शरीरात ऊर्जा देखील निर्माण करण्यास मदत करेल.
६. मसाला चहा :- हिवाळा असो किंवा उन्हाळा ऋतू कोणताही असो चहाप्रेमींना चहा लागतोच. विशेषतः थंडीच्या मोसमात चहा पिण्याचा आनंद काही वेगळाच असतो. हिवाळ्यात काळी मिरी, काळी वेलची, हिरवी वेलची, दालचिनी, आले, लवंगा घालून तुम्ही तुमच्या नेहमीच्याच चहात थोडा बदल करून आरोग्यदायी मसाला चहा तयार करु शकता.