Join us  

गळणारे केस आणि कोरड्या त्वचेवर 'एकच' उपाय; चवीला उत्तम आणि पोटभरीचा ‘असा’ मस्त उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2024 10:00 AM

Healthy Dry Fruit Laddu for good hair & skin & overall good health : तुकतुकीत त्वचा आणि घनदाट केसांसाठी रोज एक पौष्टीक लाडू खा

आजकाल स्किन आणि केसांच्या समस्या वाढत चालल्या आहेत (Skin care). यावर उपाय म्हणून आपण विविध प्रॉडक्ट्सचा वापर करतो. पण अनेक उत्पादनांमध्ये केमिकल रसायनांचा वापर होतो (Hair Care). ज्यामुळे स्किन आणि केस खराब होऊ शकतात. जर आपण देखील स्किन आणि केसांच्या निगडीत समस्येने त्रस्त असाल तर,  लाडू तयार करा. या लाडवामध्ये अनेक नट्स आणि बियांचा वापर होतो (Health Tips).

नट्स आणि बियांमधील पौष्टीक घटक स्किन आणि केसांना पोषण देते. शिवाय आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते (Ladoo). पण केस आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरणारा पौष्टीक लाडू कसा तयार करायचा? यातील पौष्टीक घटकांमुळे केस आणि त्वचेला कशा पद्धतीने फायदा होईल? पाहूयात(Healthy Dry Fruit Laddu for good hair & skin & overall good health).

केस आणि त्वचेसाठी फायदेशीर ठरणारा पौष्टीक लाडू कसा तयार करायचा?

लागणारं साहित्य

बदाम

भोपळ्याच्या बिया

सूर्यफुलाच्या बिया

अळशीच्या बिया

ऐन पावसाळ्यात तुळस सुकली? तुळस बहरेल- चहा झाल्यावर चहापत्तीचा करा ‘असा’ सोपा वापर

चिया सीड्स

खजूर

कृती

सर्वात आधी पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक कप बदाम, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, अळशीच्या बिया, चिया सीड्स घालून भाजून घ्या.

शिल्पा शेट्टीच्या फिट आणि फंटास्टिक फिगरचं रहस्य काय? पाहा आल्याचे ती करत असलेले ‘खास’ प्रयोग

नट्स आणि बिया मध्यम आचेवर भाजून घ्या. भाजून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भाजलेले नट्स आणि बिया घालून वाटून घ्या. पावडर वाटून घेतल्यानंतर त्यात एक कप खजूर घालून पुन्हा वाटून घ्या.

आता तळहातावर थोडं मिश्रण घेऊन, लाडू वळवून घ्या. अशा प्रकारे पौष्टीक लाडू खाण्यासाठी रेडी. आपण हे लाडू कधीही आणि कोणत्याही वेळी खाऊ शकता. नट्स आणि बियांमधील पौष्टीक घटकांमुळे केस आणि त्वचेला फायदा होईल.

टॅग्स :अन्नकेसांची काळजीत्वचेची काळजी