Lokmat Sakhi >Food > Healthy Dry Fruit Laddu Without sugar : ना साखर, ना गूळ; मोजक्या साहित्यापासून करा इम्यूनिटी वाढवणारे चवदार, पौष्टीक लाडू

Healthy Dry Fruit Laddu Without sugar : ना साखर, ना गूळ; मोजक्या साहित्यापासून करा इम्यूनिटी वाढवणारे चवदार, पौष्टीक लाडू

Healthy Dry Fruit Laddu Without sugar : साखर, गूळ न घालता पौष्टीक लाडू कसे तयार करायचे ते पाहूया. यामुळे  शरीरात पोषक कमतरता भरून काढण्यास मदत होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 04:12 PM2022-11-14T16:12:18+5:302022-11-14T16:22:10+5:30

Healthy Dry Fruit Laddu Without sugar : साखर, गूळ न घालता पौष्टीक लाडू कसे तयार करायचे ते पाहूया. यामुळे  शरीरात पोषक कमतरता भरून काढण्यास मदत होईल

Healthy Dry Fruit Laddu Without sugar : No sugar, no jaggery; Make Immunity Boosting Nutritional Ladoo from few ingredients | Healthy Dry Fruit Laddu Without sugar : ना साखर, ना गूळ; मोजक्या साहित्यापासून करा इम्यूनिटी वाढवणारे चवदार, पौष्टीक लाडू

Healthy Dry Fruit Laddu Without sugar : ना साखर, ना गूळ; मोजक्या साहित्यापासून करा इम्यूनिटी वाढवणारे चवदार, पौष्टीक लाडू

थंडी सुरू झाल्यानंतर सर्दी, खोकला अंगदुखीचे त्रास उद्भवतात. त्यामुळे आहारातही बदल करावा लागतो. तब्येत चांगली ठेवण्यासाठी आहारातून पुरेपूर पोषण मिळणं गरजेचं असतं. म्हणून घराघरात मेथीचे, डिंकाचे लाडू पौष्टीक लाडू खाल्ले जातात.  या लेखात साखर, गूळ न घालता पौष्टीक लाडू कसे तयार करायचे ते पाहूया. यामुळे  शरीरात पोषक कमतरता भरून काढण्यास मदत होईल. (How to make dry Fruits laddu) साखरेचा वापर नसल्यानं जास्त कॅलरीजही वाढणार नाहीत.

सुक्या मेव्याचे पौष्टीक लाडू

साहित्य

१) बदाम

२) काजू

३) खोबऱ्याचा किस

४) चारोळी

५) पिस्ता

६) खसखस

७) आक्रोड

८) डिंक

९) वेलची पूड

१०) तूप

११) जायफळ पूड

कृती

१) सगळ्यात आधी लाडू करण्यासाठी सर्व साहित्य एकत्र  करून घ्या

२) सगळ्यात आधी गॅसवर एक पॅन ठेवा त्यात थोडं तूप घालून डिंक तळून घ्या.  डिंक चांगला फुलेल याची काळजी घ्या. नंतर एका मोठ्या पातेल्यात तळलेला डिंक काढा. त्यानंतर तुपात एक एक करून काजू, बदाम परतून  घ्या. तसंच गरजेनुसार तूप घालून पिस्ता, चारोळी, खसखस परतून घ्या.

३) खोबऱ्याचा किस परतवून वरील मिश्रणात घाला.  त्यानंतर त्यात वेलचीचे दाणे आणि जायफळ पूड टाकावी आणि चांगले खालीवर करून घ्यावे. आता हे मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्यावे.. जेणकरुन त्याचे लाडू कराता येईल. या लाडूंमध्ये खजूर, मनुके असल्यानं गोडवा येतो. त्यामुळे गूळ किंवा साखरेची आवश्यकता भासत नाही.

 

Web Title: Healthy Dry Fruit Laddu Without sugar : No sugar, no jaggery; Make Immunity Boosting Nutritional Ladoo from few ingredients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.