Join us  

हेल्दी होममेड चीझ स्प्रेड, ट्राय करा सोपी - झटपट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2022 8:07 PM

Healthy Homemade Cheese Spread चीझ स्प्रेड आपण कोणत्याही पदर्थासह खाऊ शकता. घरगुती साहित्यात बनते, चवीलाही उत्तम

प्रत्येक पदार्थात चीझ टाकून खाण्याचा जणू ट्रेण्ड सुरू आहे. पिझ्झा, बर्गर या पदार्थात आपण आवडीनुसार चीझ टाकून तर खातोच. परंतु, इतर पदार्थात देखील चीझ टाकून खाण्यात येत आहे. चीझमध्ये देखील विविध प्रकार पाहायला मिळतात. त्यातील सगळ्यांना आवडणारा प्रकार म्हणजे चीझ स्प्रेड. हे चीझ स्प्रेड आपण कोणत्याही पदर्थासोबत खाऊ शकता. आपल्याला चीझ स्प्रेड घरच्या घरी बनवायचं असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे. हेल्दी आणि टेस्टी ही रेसिपी बनवायला सोपी आणि झटपट बनते.

चीझ स्प्रेड बनवण्यासाठी लागणारं साहित्य

दूध

मीठ

लिंबूचा रस अथवा व्हिनेगर

दही

चीझ क्यूब

मीठ

कृती

हेल्दी आणि टेस्टी चीझ स्प्रेड घरगुती साहित्यात बनवण्यासाठी सर्वप्रथम, एका भांड्यात दूध घ्या. दुधाला चांगली उकळी येऊ द्या. दुधाला उकळी फुटल्यानंतर त्यात मीठ घाला. आणि दुधाला चांगले ढवळत राहा.

त्यानंतर दुधात लिंबूचा रस टाका. आणि चमच्याने चांगले मिसळा. अशाने दूध फाटेल. दूध पूर्णपणे फाटल्यानंतर, एका चाळणीने पाणी वेगळे करा. बाकीचे फाटलेलं दूध मिक्सरच्या भांड्यात घ्या. त्यात दही, चीझ क्यूब आणि मीठ टाकून मिक्स करा. त्यानंतर हे मिश्रण एका डब्यात काढून घ्या. आणि फ्रिजमध्ये ठेवा. अशाप्रकारे हेल्दी चीझ स्प्रेड रेडी. आपण हे चीझ स्प्रेड कोणत्याही पदर्थासह अथवा ब्रेड टोस्टसह खाऊ शकता.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स