Join us  

अर्धा कप रवा आणि बेसन; कापसासारखी सॉफ्ट, स्पॉन्जी इडली कशी करायची? पाहा इन्स्टंट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2024 10:10 AM

Healthy & Instant Besan Rava Idli Recipe - Soft & Spongy Idli : कापसासारखी सॉफ्ट, स्पॉन्जी बेसन इडली घरीच करा - १० मिनिटात

नाश्ता असो किंवा स्नॅक्स, छोटी भूक भागवण्यासाठी काय करावं? सुचत नाही (Idli Recipe). गृहिणी आपल्या घरच्यांच्या आवडीनुसार विविध पदार्थ तयार करतात. पोहे, उपमा, इडली, डोसा करतात (Cooking Tips). साऊथ इंडियन पदार्थ आवर्जून आणि आवडीने खाल्ले जातात. पण त्याची प्रोसेस खूप मोठी असते. डाळ - तांदूळ भिजवण्यापासून ते आंबवण्यापर्यंत या वेळखाऊ प्रोसेसमुळे इडली - डोसा लवकर तयार होत नाही.

जर आपल्या डाळ - तांदुळाची इडली खायची नसेल तर, आपण रवा - बेसनाची इडली तयार करू शकता. रवा बेसनाची इडली करणं खूप सोप्पं आहे. शिवाय काही मिनिटात तयार होते. रवा - बेसनाची लुसलुशीत इडली कशी तयार करायची पाहूयात(Healthy & Instant Besan Rava Idli Recipe - Soft & Spongy Idli ).

रवा - बेसनाची इडली करण्यासाठी लागणारं साहित्य

बेसन

रवा

शिळ्या चपातीचा करा १० मिनिटात चमचमीत चिवडा, उरलेल्या पोळ्यांचं करु काय? -प्रश्नच विसरा..

दही

हळद

मीठ

पाणी

जिरं

मोहरी

तेल

कृती

सर्वात आधी एका बाऊलमध्ये अर्धा कप रवा घ्या. त्यात अर्धा कप बेसन, एक कप दही, चिमुटभर हळद, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. त्यावर १५ मिनिटांसाठी झाकण ठेवा. १० मिनिटानंतर त्यामध्ये एक चमचा इनो घाला. त्यावर एक चमचा पाणी घालून मिक्स करा.

भेंडीची भाजी करताना लक्षात ठेवा ४ सोप्या ट्रिक्स, भाजी कधी चिकट-बुळबुळीत होणारच नाही

इडली पात्राला ब्रशने तेल लावा. स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पात्रामध्ये बॅटर ओतून, पात्र स्टीमरमध्ये ठेवा. १५ मिनिटांसाठी वाफेवर इडल्या शिजवून घ्या. आता फोडणीच्या पळीत दोन चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरं आणि मोहरी घाला. मोहरी तडतडल्यानंतर त्यात एक हिरवी मिरची घाला. तयार फोडणी इडलीवर ओतून पसरवा. अशा प्रकारे रवा - बेसनाची इडली तयार.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स