लहान मुलं काहीही खायला नाटकं करतात, खाण्यासाठी मोबाईल दाखवावा लागतो किंवा सतत मागे लागावं लागत असं घरांघरातल्या पालकांची तक्रार असते. (Healthy Foods For kids) साधं जेवण मुलांना कधीच नको असतं बाहेरचे अन्नपदार्थ किंवा घरात बनवलेले चमचमीत पदार्थ खावेसे वाटतात. (Dry Fruits Laddu)
काहीजणांना गोड पदार्थ कॅन्डीज,चॉकले्टसच फार आवडतात. पोषणाचा अभाव असल्यास मुलं अशक्त होतात, सडपातळ दिसतात त्यांचा आत्मविश्वासही कमी होतो. हे टाळण्यासाठी तुम्ही मुलांना खायला आवडतील असे पौष्टीक ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवू शकता. हे लाडू खाल्ल्याने मुलांना एनर्जी येईल आणि वजनातही वाढ होईल. (Dry Fruits Laddu Recipe For kids)
एनर्जी बॉल्स पौष्टीक लाडू करण्याचे साहित्य
१) बदाम- बदाम हे एनर्जीचे उत्तम सोर्स आहे. यात हेल्दी फॅट्स, प्रोटीन्स आणि व्हिटामीन्स असतात. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रोज सकाळी भिजवलेले बदाम खावे. ५ ते १० वर्ष वयोगटातील मुलांनी २ ते ४ बदाम दिवसाला खावेत, १८ ते २० वयोगटात असलेल्यांनी ६ ते ८ बदाम खावेत.
२) सुकी खारीक- यामुळे लाडूंना नैसर्गिक गोडवा येईल. खारीक खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता कमी होते. याशिवाय खारीक खाल्ल्याने बराचवेळ भूकही लागत नाही.
३) काजू- काजूमधून प्रोटीन्स, हेल्दी फॅट्स, इसेंशियल न्युट्रिएंट्स
४) खोबऱ्याचा किस- खोबऱ्यामुळे लाडूंना चांगले टेक्सचर येते आणि लाडू मऊ होतात.
५) तूप किंवा नारळाचे तेल- यामुळे हाडांना पोषण मिळते.
मुलांसाठी पौष्टीक लाडू करण्याची सोपी रेसिपी
१) हे लाडू करण्यासाठी सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये बदाम काढून घ्या. त्यात खारीक आणि काजू घाला. तुम्ही यात सुक्या खोबऱ्याचा किसही घालू शकता. हे पदार्थ मिसळून पावडर तयार करून घ्या.
२) यात तूप किंवा नारळाचे तेल घाला, व्यवस्थित एकजीव करून या मिश्रणाचे लाडू वळून घ्या.
३) तुम्ही मुलांच्या आवडीप्रमाणे लाडूचा आकार लहान मोठा ठेवू शकता. वरून कोटींग करण्यासाठी तुम्ही डेसिकेटेट कोकोनटचा वापर करू शकता.
मुलांचं पुढचं पाठ मागचं सपाट होतं? ६ पदार्थ खायला द्या, सगळं तोंड पाठ होईल-स्मरणशक्ती वाढेल
४) हे लाडू एका ताटात काढून घ्या आणि फ्रिजमध्ये ठेवा. हे एनर्जी बॉल्स नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहेत. यात हेल्दी फॅट् असतात.यात साखर-गूळ वापरली जात नाही, नैसर्गिक साखरेचा वापर करून हे लाडू बनवले जातात.