Lokmat Sakhi >Food > ऐन तारुण्यात हाडं ठणकतात? नजरही धूसर झाली? रोज खा '१' पौष्टीक लाडू; आरोग्य सुधारेल

ऐन तारुण्यात हाडं ठणकतात? नजरही धूसर झाली? रोज खा '१' पौष्टीक लाडू; आरोग्य सुधारेल

Healthy Ladoo for Strong Bones, Hair Growth & Glowing Skin : एका लाडूची पाहा कमाल! हाडं-केस आणि त्वचाही चमकेल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2024 10:00 AM2024-04-26T10:00:00+5:302024-04-26T10:00:02+5:30

Healthy Ladoo for Strong Bones, Hair Growth & Glowing Skin : एका लाडूची पाहा कमाल! हाडं-केस आणि त्वचाही चमकेल..

Healthy Ladoo for Strong Bones, Hair Growth & Glowing Skin | ऐन तारुण्यात हाडं ठणकतात? नजरही धूसर झाली? रोज खा '१' पौष्टीक लाडू; आरोग्य सुधारेल

ऐन तारुण्यात हाडं ठणकतात? नजरही धूसर झाली? रोज खा '१' पौष्टीक लाडू; आरोग्य सुधारेल

बिघडलेली जीवनशैलीमुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो (Health Care). फक्त वजनच नाही, तर ऐन तारुण्यात हाडं ठणकणे, दृष्टी कमी होणे, ब्लड प्रेशरचा त्रास, मधुमेह, पाठदुखी, यासह गंभीर आजारांचाही धोका वाढतो (Laddoo). मुख्य म्हणजे केस आणि त्वचेच्या निगडीत देखील समस्या वाढत जातात (Bone Health). गंभीर आजारांचा धोका वाढत असेल तर, आपण आहारात काही बदल करतो. किंवा औषधोपचार घेतो.

पण बदल करूनही जर आरोग्यात बदल घडत नसतील तर, पौष्टीक लाडू खा. हा लाडू अनेक साहित्यांचा वापर करून तयार केला जातो. यातील पौष्टीक घटक हाडांना बळकटी, त्वचा चमकदार आणि केसांना पोषण देते. पण लाडू कसा बनवायचा? पौष्टीक लाडू कधी खावा? याने आरोग्याला किती फायदे मिळतील? पाहूयात(Healthy Ladoo for Strong Bones, Hair Growth & Glowing Skin).

पौष्टीक लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य

पांढरे तीळ

आळशी

तूप

बदाम

टिपिकल गुजराथी पद्धतीचा पारंपरिक खमण ढोकळा खायचाय? करा फक्त १५ मिनिटांत, पाहा रेसिपी

अक्रोड

पिस्ता

मनुके

भोपळ्याच्या बिया

सुकं खोबरं

गुळ खजूर

कृती

सर्वप्रथम, कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक कप पांढरे तीळ घाला. मध्यम आचेवर पांढरे तीळ भाजून घ्या. तिळाचा रंग तपकिरी झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर त्यात एक चमचा आळशीच्या बिया घालून भाजून एका बाऊलमध्ये काढून घ्या.

आता कढईत एक मोठा चमचा तूप घाला. तूप गरम झाल्यानंतर त्यात अर्धा कप बदाम, काजू, अक्रोड घालून भाजून घ्या. नंतर त्यात ४ ते ५ पिस्ता आणि मनुके घालून भाजून घ्या. भाजलेले ड्रायफ्रुट्स एका प्लेटमध्ये काढून घ्या.

आता कढईत एक चमचा भोपळ्याच्या बिया, अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घालून भाजून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले ड्रायफ्रुट्स घालून पावडर तयार करा. नंतर त्यात इतर भाजलेले साहित्य, गुळ आणि खजूर घालून वाटून घ्या.

आता हाताला थोडे तूप लावा. थोडे मिश्रण हातावर घ्या, आणि लाडू वळवून घ्या.  अशाप्रकारे पौष्टीक लाडू खाण्यासाठी रेडी. लाडू तयार झाल्यानंतर हवाबंद डब्यात ठेवा, आणि रोज एक लाडू खा.

पांढऱ्या तिळाचे फायदे

तीळ आपल्या हाडांना मजबूत करण्यासाठी, ब्लड फ्लो आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. पांढऱ्या तिळामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम, फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळते. त्यात भरपूर प्रमाणात खनिजे देखील आढळते. ज्यामुळे हाडांची वाढ आणि त्वचेचा पोतही सुधारतो.

सकाळी कोमट पाण्यात मिसळून २ गोष्टी प्या, वजन घटेल भरभर- पोटही होईल सपाट

आळशीच्या बिया खाण्याचे फायदे

आळशीच्या बिया अनेक गुणांनी परिपूर्ण आहे. यात ओमेगा ३ फॅटी एसिड प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. शिवाय त्यात फायबर देखील असते. ज्यामुळे पचन सुधारते, आणि स्किन व केसांनाही फायदा होतो. 

Web Title: Healthy Ladoo for Strong Bones, Hair Growth & Glowing Skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.