Lokmat Sakhi >Food > कमी वयात हाडं कमकुवत - गुडघेदुखी त्रस्त? ४ बियांचे करा पौष्टीक लाडू; तब्येत राहील ठणठणीत

कमी वयात हाडं कमकुवत - गुडघेदुखी त्रस्त? ४ बियांचे करा पौष्टीक लाडू; तब्येत राहील ठणठणीत

Healthy Ladoo for Strong Bones, Hair Growth & Glowing Skin| High Protein Ladoo Recipe : हाडांसाठी 'या' साहित्यांचा वापर करून पौष्टीक लाडू तयार करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2024 08:12 PM2024-07-11T20:12:25+5:302024-07-11T20:13:47+5:30

Healthy Ladoo for Strong Bones, Hair Growth & Glowing Skin| High Protein Ladoo Recipe : हाडांसाठी 'या' साहित्यांचा वापर करून पौष्टीक लाडू तयार करा..

Healthy Ladoo for Strong Bones, Hair Growth & Glowing Skin| High Protein Ladoo Recipe | कमी वयात हाडं कमकुवत - गुडघेदुखी त्रस्त? ४ बियांचे करा पौष्टीक लाडू; तब्येत राहील ठणठणीत

कमी वयात हाडं कमकुवत - गुडघेदुखी त्रस्त? ४ बियांचे करा पौष्टीक लाडू; तब्येत राहील ठणठणीत

आजकाल प्रत्येकाला हाडांच्या निगडीत समस्या छळत आहे (Healthy Laddoo). हाडं दुखतात, जास्त चालल्यावर गुडघे दुखतात. कमी वयातच ही समस्या असेल तर, पन्नाशीनंतर हाडं ठिसूळ आणि कमकुवत होऊ शकतात (Bones Health). त्यामुळे खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. हाडं ठिसूळ होऊ नये म्हणून, आपण घरगुती उपायांना फॉलो करू शकता. यासाठी पौष्टीक गोष्टींचा वापर करून लाडू तयार करा.

ना साखर - न जास्त साहित्य, काही बिया, तूप, खजूर आणि गुळाचा वापर करून पौष्टीक लाडू तयार करा. यामुळे हाडं अधिक मजबूत होतील. आणि केसांच्या निगडीतही समस्या सुटतील. हा पौष्टीक लाडू नेमका कसा करावा? पाहूयात(Healthy Ladoo for Strong Bones, Hair Growth & Glowing Skin| High Protein Ladoo Recipe).

हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी घरगुती साहित्यात तयार करा पौष्टीक लाडू

लागणारं साहित्य

भोपळ्याच्या बिया

अळशीच्या बिया

दात नीट घासले तरी दातांवर पिवळा थर येतो? घरच्याघरी खास टूथपावडर, अमेरिकन तज्ज्ञ सांगतात उपाय

सूर्यफुलाच्या बिया

पांढरे तीळ

नाचणीचं पीठ

गुळ

खजुरची पेस्ट

वेलची पूड

या पद्धतीने तयार करा हेल्दी लाडू

सर्वात आधी कढई गरम करण्यासाठी ठेवा. त्यात एक कप भोपळ्याच्या बिया घालून भाजून घ्या. भोपळ्याच्या बिया भाजून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या. नंतर त्यात अर्धा कप अळशीच्या बिया घालून भाजून घ्या. नंतर एक कप सूर्यफुलाच्या बिया, अर्धा कप पांढरे तीळ घालून भाजून घ्या, व मिक्सरच्या भांड्यात सर्व भाजलेले साहित्य घालून वाटून घ्या.

नंतर कढईमध्ये २ चमचे तूप घाला. त्यात अर्धा कप नाचणीचं पीठ घालून भाजून घ्या, व एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात भाजलेल्या बियांची पावडर घालून मिक्स करा.

कढईमध्ये पुन्हा २ चमचे तूप घाला. त्यात एक कप किसलेला गुळ, २ चमचे खजूरची पेस्ट घालून मिक्स करा. गुळ वितळल्यानंतर बाऊलमधल्या मिश्रणात मिक्स करा. नंतर त्यात एक चमचा वेलची पूड घालून सर्व साहित्य एकजीव करून लाडू वळवून घ्या. अशा प्रकारे पौष्टीक लाडू खाण्यासाठी रेडी. स्टोर करून ठेवल्यास हे लाडू महिनाभर आरामात टिकतात.

भोपळ्याच्या बिया खाण्याचे फायदे

भोपळ्याच्या बिया खाण्याचे अनेक फायदे आहेत. या बियांमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. मॅग्नेशियम हाडे मजबूत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. भोपळ्याच्या बिया हाडे फ्रॅक्चर आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या जोखीम टाळण्यास मदत करतात.

सूर्यफुलाच्या बिया खाण्याचे फायदे

सूर्यफुलाच्या बियांमध्ये प्रथिने, जस्त, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन बी, बी 6, निरोगी चरबी, फायबर आढळते. जे आरोग्याच्या निगडीत अनेक समस्या सोडवण्यास मदत करतात.

पावसाळ्यात चहा हवाच, पण ॲसिडिटी-गॅसेसचा त्रास छळतो? चहात मिसळा १ सोनेरी गोष्ट, पाहा फरक

अळशीच्या बिया खाण्याचे फायदे

अळशीच्या बिया अनेक गुणांनी परिपूर्ण आहे. यात ओमेगा 3 फॅटी एसिड प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ज्यामुळे पचन सुधारणे, हृदय आणि हाडांसाठीही फायदेशीर ठरते.

Web Title: Healthy Ladoo for Strong Bones, Hair Growth & Glowing Skin| High Protein Ladoo Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.