नाचणीची भाकरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य
नाचणीचे पीठ - अर्धा कप
गव्हाचे पीठ - 2 मोठे चमचे
तांदळाचे पीठ - अर्धा कप
किसलेले गाजर - 2 चमचे
बारीक चिरलेला कांदा - 2 चमचे
किसलेलं आलं - 1/4 चमचा
हिरवी मिरची चिरलेली
हिरवी कोथिंबीर चिरलेली
जिरे
कढीपत्ता
तेल - आवश्यकतेनुसार
मीठ - चवीनुसार
कृती
एका मोठ्या परातीत सर्वप्रथम नाचणीचे पीठ, गहूचे पीठ आणि तांदळाचे पीठ घ्यावे. हे पीठ चांगले मिक्स करून घ्यावे. त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, किसून घेतलेला गाजर, किसलेलं आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, कढीपत्ता आणि मीठ चवीनुसार टाकावे. आणि हे मिश्रण चांगले मिक्स करावे. जशाप्रकरे आपण भाकरी बनवण्यासाठी पीठ मळतो, त्याचप्रकारे पाणी टाकून भाकरी बनवून घेणे. आता नॉनस्टिक तव्याला चांगले तापवून घ्यावे त्यात एक मोठा चमचा तेल टाकून पसरवून घ्यावे. तवा तापल्यानंतर भाकरी तव्यात टाकावी. पीठ असलेल्या बाजूवर पाणी लावून घ्यावे. आता भाकरी दोन्ही बाजूने चांगली क्रिस्पी भाजून घ्यावी. आणि शेवटी तेल लावून सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यावे. अशाप्रकारे आपली नाचणीची पौष्टीक भाकरी खाण्यास रेडी. ही भाकरी आपण दही अथवा इतर भाज्यांसह किंवा असेही खाऊ शकता.