Join us  

आरोग्यवर्धक नाचणीच्या भाकरीची रेसिपी, बनवायला सोपी - झटपट, घरी नक्की ट्राय करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 7:35 PM

Ragi Bread Healthy Recipe पौष्टिकतेने भरपूर असलेली नाचणीची भाकरी एकदा नक्की घरी करून पहा, बनवायला झटपट, चवीलाही उत्तम

पौष्टीकतेने भरपूर असलेली नाचणीची भाकरी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी नाचणीची भाकरी केव्हाही उत्तम. ज्वारीच्या भाकरीपेक्षा लोकं नाचणीची भाकरी खातात. कारण त्या भाकरीत प्रचंड प्रमाणात कार्बोहाड्रेडस, प्रोटीन्स, फायबर्स आढळून येते. एवढंच नाही तर नाचणीत मुबलक प्रमाणात कॅल्शियम, आयर्न देखील असतं. जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. नाचणी खाल्याने शरीरात ॲमिनो ॲसिडची निर्मिती होते, ॲमिनो ॲसिड मानवी शरीरासाठी आवश्यक असते, यातील व्हॅलिन शरीरातील टिश्यूची होणारी हानी भरून काढतं, मासंपेशी आणि चयापचय यांच्यातील संवाद आणि समतोल राखण्याचा प्रयत्न करतं, शरीरातील नायट्रोजनची पातळी टिकवून ठेवण्यास मदत होते. या बहुगुणी नाचणीपासून भाकरीऐवजी आपण विविध पदार्थ देखील बनवू शकता. आज आपण नाचणीची भाकरी कशी बनवायची याची रेसिपी जाणून घेणार आहोत.

नाचणीची भाकरी बनवण्यासाठी लागणारं साहित्य

नाचणीचे पीठ - अर्धा  कप

गव्हाचे पीठ - 2 मोठे चमचे 

तांदळाचे पीठ - अर्धा कप

किसलेले गाजर - 2 चमचे 

बारीक चिरलेला कांदा - 2 चमचे 

किसलेलं आलं - 1/4 चमचा 

हिरवी मिरची चिरलेली

हिरवी कोथिंबीर चिरलेली 

जिरे 

कढीपत्ता 

तेल - आवश्यकतेनुसार

मीठ - चवीनुसार

कृती

एका मोठ्या परातीत सर्वप्रथम नाचणीचे पीठ, गहूचे पीठ आणि तांदळाचे पीठ घ्यावे. हे पीठ चांगले मिक्स करून घ्यावे. त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, किसून घेतलेला गाजर, किसलेलं आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरे, कढीपत्ता आणि मीठ चवीनुसार टाकावे. आणि हे मिश्रण चांगले मिक्स करावे. जशाप्रकरे आपण भाकरी बनवण्यासाठी पीठ मळतो, त्याचप्रकारे पाणी टाकून भाकरी बनवून घेणे. आता नॉनस्टिक तव्याला चांगले तापवून घ्यावे त्यात एक मोठा चमचा तेल टाकून पसरवून घ्यावे. तवा तापल्यानंतर भाकरी तव्यात टाकावी. पीठ असलेल्या बाजूवर पाणी लावून घ्यावे. आता भाकरी दोन्ही बाजूने चांगली क्रिस्पी भाजून घ्यावी. आणि शेवटी तेल लावून सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यावे. अशाप्रकारे आपली नाचणीची पौष्टीक भाकरी खाण्यास रेडी. ही भाकरी आपण दही अथवा इतर भाज्यांसह किंवा असेही खाऊ शकता.

टॅग्स :अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.