Join us  

द्राक्षांच्या मौसमात करायलाच हवे 'ग्रेप्स ब्लॉसम ', मन आणि शरीराला थंडावा देणारे गारेगार पेय - पाहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2023 11:04 AM

Healthy Refreshing Mocktail Recipe At Home: Grapes Blossom : Grape Juice Recipe : केवळ २ स्टेप्समध्ये झटपट तयार होणारे गारेगार ग्रेप्स ब्लॉसम ...

द्राक्षांचा सिझन सुरु झाल्यामुळे सध्या बाजारांत भरपूर द्राक्ष पहायला मिळतात. आपण काळीभोर टपोरी, लालचुटुक, हिरवीगार द्राक्ष अशा वेगवेगळ्या जातींची, प्रकारची द्राक्ष खातो. द्राक्षे आरोग्यासाठी फारच फायद्याची असतात. द्राक्षांमध्ये ग्लुकोज,मॅग्नेशिअम असे काही घटक असतात. जे शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. बाजारातून द्राक्ष आणताना आपण ती लांब, गोड, टपोरी, रसदार आहेत हे बघून मगच विकत घेतो. द्राक्ष चांगली निवडलेली असतील तर ती चवीला छान गोड लागतात. द्राक्ष जास्त काळ टिकत नाहीत. त्यामुळे ती लवकरात लवकर खावी लागतात. 

वाढत्या ऊन्हामुळे गरम्याने आपला जीव कासावीस होतो, घशाला कोरड पडते, यामुळे सतत काहीतरी थंड खावंसं वाटतं. ऊन्हाळ्यांत ऊष्णतेमुळे शरीरांतील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. अशावेळी आपण भरपूर पाणी व फळांचे रस यांचे सेवन करण्यावर भर देतो. फळांचे रस, मिल्कशेक बनवून प्यायल्याने ऊन्हाळ्यांत पोटाला थोडासा थंडावा मिळतो. ऊन्हाळ्यांत द्राक्षांचा सिझन सुरु असल्याकारणाने द्राक्षांच्या रसापासून छान ग्रेप्स ब्लॉसम मिल्कशेक तयार करु शकतो. द्राक्षांपासून ग्रेप्स ब्लॉसम मिल्कशेक तयार करण्याची झटपट सोपी कृती पाहूयात(Healthy Refreshing Mocktail Recipe At Home: Grapes Blossom : Grape Juice Recipe).   

साहित्य :- १. काळी द्राक्षे - १ कप २. बर्फाचे खडे - ६ ते ७ खडे ३. व्हॅनिला प्लेन आईस्क्रीम - ३ मोठे स्कुप ३. साखर - १ टेबलस्पून (आपल्या आवडीनुसार)४. दूध - १ कप 

कृती :- 

१. सर्वप्रथम बाजारांतून विकत आणलेली काळी द्राक्षे स्वच्छ धुवून घ्यावीत. २. एका मिक्सरच्या भांड्यात काळी द्राक्षे, बर्फाचे खडे, व्हॅनिला प्लेन आईस्क्रीम, साखर, दूध हे सगळे जिन्नस एकत्रित करुन घ्यावेत. 

३. आता मिक्सरमध्ये हे सर्व जिन्नस किमान २ वेळा व्यवस्थित फिरवून घ्यावे. ४. त्यानंतर काळ्या द्राक्षांपासून तयार झालेले ग्रेप्स ब्लॉसम पिण्यासाठी एका ग्लासात काढून घ्यावे. 

आता आपले ग्रेप्स ब्लॉसम पिण्यासाठी तयार आहे. आपल्या आवडीनुसार, द्राक्षांचे छोटे छोटे तुकडे करुन ग्रेप्स ब्लॉसम सर्व्ह करताना त्यावर घालून छान सजवू शकता.

टॅग्स :अन्नपाककृती