नवरात्रीचा सण सुरु होणार आहे. नवरात्रीत अनेकजण उपवास करतात. उपवास म्हटलं की आपण काही मोजकेच पदार्थ खाऊ शकतो. या मोजक्या पदार्थांमध्ये आपण साबुदाणा खिचडी - वडा, चिवडा, वेफर्स असे अनेक पदार्थ खातो. खरंतर उपवासाचे पदार्थ म्हटले की त्यात साबुदाणा, बटाटा, तेल यांसारख्या पदार्थांचा वापर फार मोठ्या प्रमाणावर केला जातो. उपवासाला खाल्ले जाणारे बहुतेक पदार्थ हे तेलकट - तुपकट किंवा आपल्या शरीरातील फॅट्सचे प्रमाण वाढवणारेच असतात(delicious smoothies to enjoy during your fast).
उपवास केला असताना काहीवेळा आपले हे पोट बऱ्यापैकी रिकामीच असते. रिकाम्या पोटी असे तेलकट पदार्थ खाण्याने आपल्याला अपचन, अॅसिडिटी किंवा इतर पोटाच्या समस्या सतावू शकतात. यासाठीच नवरात्रीत उपवास करताना शक्यतो हेल्दी (Navratri special smoothie recipes to make fasting fun) आणि आपल्या आरोग्याला पोषण देणारे पौष्टिक पदार्थ खाणे आवश्यक असते. यासोबतच आपले शरीर उपवासादरम्यान डिहायड्रेट होऊ नये यासाठी खाण्यासोबतच भरपूर पाणी आणि लिक्विड पदार्थ देखील घेतलेच पाहिजे. उपवासाला लिक्विड पदार्थांमध्ये आपण ताक, दही, लस्सी अशी पेय पिणे पसंत करतो. याबरोबर आपण झटपट होणारी उपवासाची हेल्दी स्मूदी देखील पिऊ शकतो. घरात उपलब्ध असणाऱ्या उपवासाच्या मोजक्याच पदार्थांचा वापर करून ही हेल्दी स्मूदी कशी तयार करायची याची सोपी रेसिपी पाहूयात(Healthy Smoothie Recipe for Navratri Fasting).
साहित्य :-
१. थंड दूध - १ कप २. केळं - १ (केळ्याचे काप)३. मखाणे - १/२ कप ४. बदाम - ६ ते ७ तुकडे (बदामाचे काप) ५. काजू - ६ ते ७ तुकडे (काजूचे काप)६. खजूर - २ ते ३ (बिया काढून घेतलेले)७. वेलची पूड - चिमूटभर ७. बर्फाचे खडे - ७ ते ८ खडे ८. ड्रायफ्रूट्सचे काप - १/२ टेबलस्पून ९. ड्राय गुलाबाच्या पाकळ्या - ६ ते ७ पाकळ्या
फक्त १ कप साबुदाणा आणि उकडलेला बटाटा- करा उपवासाचे नगेट्स! कुरकुरीत-चव कमाल...
नवरात्र स्पेशल : ९ दिवस उपवास करणार? ‘अशी’ करा तयारी, फराळ होईल झटपट-पित्तही होणार नाही...
कृती :-
१. एका मिक्सरच्या जारमध्ये केळ्याचे काप, मखाणे, काजू बदामाचे काप, बिया काढून घेतलेले खजूर, चिमूटभर वेलची पूड, बर्फाचे खडे आणि सगळ्यात शेवटी थंड दूध ओतावे. २. आता मिक्सर फिरवून या सगळ्या पदार्थांची स्मूदी तयार करुन घ्यावी.
३. मिक्सरमध्ये सगळे जिन्नस फिरवून घेतल्याने ते एकत्रित ब्लेंड होऊन स्मूदी छान तयार होते. आता ही स्मूदीमिक्सर जारमधून एका भांड्यात काढून घ्यावी. ४. आता एका ग्लासात बर्फाचे खडे घेऊन त्यात ही स्मूदी ओतावी त्यानंतर त्यावरुन आपल्या आवडत्या ड्रायफ्रूट्सचे काप आणि ड्राय गुलाबाच्या पाकळ्या घालून स्मूदी पिण्यासाठी सर्व्ह करावी.
अशाप्रकारे आपण उपवासाचे मोजकेच पदार्थ वापरुन झटपट तयार होणारी स्मूदी तयार करु शकतो.