Lokmat Sakhi >Food > दिवसाची सुरुवात करा टेस्टी आणि हेल्दी; नाश्त्याला खा ओट्सचा मिनी उत्तप्पम

दिवसाची सुरुवात करा टेस्टी आणि हेल्दी; नाश्त्याला खा ओट्सचा मिनी उत्तप्पम

नाश्त्याला ओट्स ( healthy oats for breakfast) खाणे हे आरोग्यदायी आहे. ते चविष्ट पध्दतीनं खाण्यासाठी अनेक पर्याय आहेत. त्यातलाच एक पर्याय म्हणजे (oats mini uttapam) ओट्स मिनी उत्तप्पम.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2022 10:05 AM2022-06-23T10:05:29+5:302022-06-23T10:10:01+5:30

नाश्त्याला ओट्स ( healthy oats for breakfast) खाणे हे आरोग्यदायी आहे. ते चविष्ट पध्दतीनं खाण्यासाठी अनेक पर्याय आहेत. त्यातलाच एक पर्याय म्हणजे (oats mini uttapam) ओट्स मिनी उत्तप्पम.

Healthy start of day with oats. Oats mini uttapam healthy recipe for breakfast | दिवसाची सुरुवात करा टेस्टी आणि हेल्दी; नाश्त्याला खा ओट्सचा मिनी उत्तप्पम

दिवसाची सुरुवात करा टेस्टी आणि हेल्दी; नाश्त्याला खा ओट्सचा मिनी उत्तप्पम

Highlightsनाश्त्याला ओट्सचे पदार्थ खाल्ल्यानं वजन आटोक्यात राहातं आणि शरीराला पोषक गुणधर्म मिळतात. 

सकाळचा नाश्ता म्हणजे दिवसातला पहिला आहार.  सकाळच्या नाश्त्यावर चयापचय क्रियेचा वेग, पचन क्रिया, शरीराची ऊर्जा अवलंबून असते. त्यामुळे नाश्त्याला काहीबाही नाही तर आरोग्यदायी पदार्थ (healthy breakfast) खाण्याला महत्व आहे. सकाळच्या नाश्त्याचं आहारातील महत्व लक्षात घेता ओट्सच्या पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला आहार तज्ज्ञ देतात. नाश्त्याला ओट्सचे पदार्थ (oats for breakfast)  खाल्ल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहातं. शरीराला ॲण्टिऑक्सिडण्टस मिळतात. आतड्यात आरोग्यदायी जिवाणू तयार होण्यास मदत मिळते. ओट्सचे पदार्थ खाल्ल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. बध्दकोष्ठता आणि पचनाच्या समस्या सुटतात. नाश्त्याला ओट्स खाणे हे आरोग्यदायी आहे. ते चविष्ट पध्दतीनं खाण्यासाठी अनेक पर्याय आहेत. त्यातलाच एक पर्याय म्हणजे ओट्सचा मिनी उत्तप्पम. ओट्सच्या मिनी उत्तप्पमची (how to make oats mini uttapam) रेसिपी सोपी आहे. 

Image: Google

ओट्स मिनी उत्तप्पम कसा करावा?

ओट्स मिनी उत्तप्पम करण्यासाठी अर्धा कप ओट्स, अर्धा कप किसलेलं गाजर, पाऊण कप सिमला मिरची, 1 मोठा चमचा ऑलिव्ह तेल, थोडी पिवळी सिमला मिरची, पाऊण कप रवा, 1 मोठा चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, पाऊण कप पनीर, 4 मोठे चमचे घट्ट दही, थोडी मिरे पूड आणि चवीपुरतं मीठ घ्यावं. 

Image: Google

ओट्सचा मिनी उत्तप्पम करताना ओट्स मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावेत. बारीक केलेले ओट्स एका भांड्यात काढून त्यात रवा घालावा. ओट्स आणि रवा एकत्र करुन त्यात दही आणि थोडं पाणी घालावं. मिश्रण जास्त घट्ट आणि पातळ असू नये. या मिश्रणात चवीपुरतं मीठ आणि काळे मिरे पूड घालावी. सर्व जिन्नस एकत्र करुन ते 5 मिनिटं बाजूला ठेवावं. नंतर नाॅन स्टिक तवा गॅसवर ठेवावा. तव्याला ऑलिव्ह तेल लावावं. तव्यावर एक चमचा मिश्रण घालून ते पसरवून घ्यावं. पसरलेल्या मिश्रणावर त्यावर किसलेलं गाजर, पनीर, हिरवी मिरची, सिमला मिरची पसरवून घालावी. तव्यावर झाकण ठेवून मंद आचेवर ते शिजू द्यावं. थोड्या वेळानं झाकण काढावं. उत्तप्पमची एक बाजू सोनेरी झाल्यावर उत्तप्पम उलटवून दुसऱ्या बाजूनही शेकून घ्यावा. उत्तप्पम दोन्ही बाजूंनी खरपूस आणि कुरकुरीत शेकून घ्यावा. ओट्सचा मिनी उत्तप्पम टमाटा केचप किंवा पुदिन्याच्या हिरव्या चटणीसोबत छान लागतो. 

Web Title: Healthy start of day with oats. Oats mini uttapam healthy recipe for breakfast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.