नागपंचमी सण उद्यावर आला आहे. प्रत्येक मुलीला माहेरची आठवण करून देणारा हा नागपंचमीचा सण. श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला नैवेद्य दाखवणायची प्रथा आहे. या सणाला विशेषत: गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीच्या पुरणाची दिंड, तसेच हळदीच्या पानातील पातोळ्या बनवल्या जातात.
कोकणातील काही पदार्थांची चव ही नेहमीच खास असते. काही सण असेल तर कोकणात वेगळ्या पद्धतीचे गोड पदार्थ बनवले जातात. नागपंचमीचा सण कोकणातील विशेष पारंपरिक खाद्य संस्कृतीची आठवण करून देतो. कोकणात नागपंचमीला हमखास बनणारा पदार्थ म्हणजे हळदीच्या पानांतील पातोळ्या (Haldichya Panatil Patolya). श्रावण महिन्यात स्वतःच्याच परसातील डोलणारी हळदीची पाने, माडाच्या झाडावरून काढलेले रसरशीत ओले नारळ, सुगरणींचा उत्साह आणि खवय्यांना सणाचे निमित्त. पातोळ्यांचा पहिला घाणा वाफवायला ठेवला की घरभर दरवळणारा हळदीच्या पानांचा सुगंध खवय्यांच्या पोटातील भूक चळवतो. गरमागरम पातोळ्यांवर साजूक तुपाची धार सोडून ७ ते ८ पातोळ्या फस्त केल्यावरच आपला जीव शांत होतो(Healthy Sweet Patolya, Haldichya Panatil Patolya).
साहित्य :-
१. तूप - ४ ते ५ टेबलस्पून
२. किसलेलं ओलं खोबर - २ कप
३. किसलेला गूळ - २ कप
४. हळदीची पाने - ६ ते ८ पाने
५. तांदुळाचे पीठ - २ कप
६. पाणी - २ कप
७. मीठ - चवीनुसार
८. वेलची पूड - चिमूटभर
करुन पाहा वांग्यांचं रायतं; वांग्याचं भरीत आणि वांग्याची कापं विसराल असा मस्त चमचमीत पदार्थ...
गुळाचा चहा फुटू नये म्हणून ५ टिप्स, न फाटता - न नासता चहा होईल फक्कड !!
कृती :-
१. सर्वप्रथम एका कढईत तूप घेऊन त्यात गूळ घालून तो गूळ व्यवस्थित वितळवून घ्यावा.
२. तुपात गूळ संपूर्णपणे वितळवून झाल्यावर त्यात किसलेलं खोबर व चिमूटभर वेलची पूड घालावी.
३. आता खोबर व गूळ एकत्रित चमच्याने ढळवून घेऊन ते एकजीव करून त्यांचे सारण बनवून घ्यावे.
४. हे सारण एका वेगळ्या डिशमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यावे.
५. आता एका मोठ्या भांड्यांत सम प्रमाणात पाणी व तांदुळाचे पीठ घेऊन त्या पिठाची उकड काढून घ्यावी. पिठाची उकड काढताना त्यात चवीनुसार मीठ घालावे.
फोडशीची रानभाजी खायला नाक मुरडणारे देखील फोडशीची भजी चवीने खातील, चमचमीत व पौष्टिक रेसिपी
घरच्याघरी १० मिनिटांत चहा मसाला करण्याची सोपी कृती, पावसाळ्यात ‘मसाला चाय’ प्या मनसोक्त...
६. या पिठाची उकड काढल्यानंतर, ही उकड एका डिशमध्ये काढून घेऊन तेलाचा हात लावून ही उकड मळून घ्यावी.
७. हळदीची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावीत. आता या हळदीच्या पानांवर किंचितसे तेल लावून तांदुळाच्या पिठाचा गोळा हलक्या हातांनी थापून घ्यावा.
८. त्यानंतर यात खोबऱ्याचे सारण भरून हळदीचे पान दुमडून घ्यावे, त्यानंतर सगळ्या बाजुंनी पातोळी व्यवस्थित बंद करून घ्यावी.
९. आता एक चाळण घेऊन त्यात या सगळ्या पातोळ्या ठेवून १५ ते २० मिनिटे वाफवून घ्याव्यात.
१०. एका मोठ्या टोपात गरम पाणी घेऊन त्यावर ही चाळण ठेवून वरून झाकण ठेवावे.
हळदीच्या पानांतील पातोळ्या खाण्यासाठी तयार आहेत.