Join us  

कच्चं तर जाऊ द्या तापवलेलं दूधही अनेकदा नासतं.. 3 युक्त्या करुन पाहा दूध फाटणार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2022 7:58 PM

दुधाच्या बाबतीत काळजी घेतली नाही तर ते नासतं हे जरी खरं असलं तरी काही युक्त्या वापरल्यास दूध फाटण्याची चिंता दूर होते. ती कशी?

ठळक मुद्दे कच्चं दूध देखील न तापवता अनेक दिवस चांगलं राहू शकतं. 

बदलत्या हवामानाचा परिणाम पदार्थांवरही होतो. त्यात दुधाला तर फारच जपावं लागतं. दूध आणल्यानंतर तापवण्यास जरा जरी उशीर केला की दूध हल्ली फाटतं. ताजंच दूध नाही तर अनेकदा एकदा तापवून फ्रिजमध्ये ठेवलेलं दूधही अनेकदा फाटतं. नेमकं चहा करतानाच दूध नासण्याचा अनुभव तर अनेकांनी घेतलेला असतो. दुधाच्या बाबतीत काळजी घेतली नाही तर ते फाटतं हे जरी खरं असलं तरी काही युक्त्या वापरल्यास दूध फाटण्याची चिंता दूर होते. कच्चं दूध देखील न तापवता अनेक दिवस चांगलं राहू शकतं. ते कसं?

Image: Google

दूध फाटू नये म्हणून 

1. कच्चं दूध न तापवता अनेक दिवस राहू शकतं असं म्हटलं तर विश्वास कसा बसेल? त्यासाठी एक युक्ती करुनच पाहायला हवी. दूध आणल्यानंतर ते फ्रिजरमध्ये ठेवावं. पिशवीतलं दूध असल्यास दुधाची पिशवी फ्रिजमध्ये ठेवावी किंवा गवळ्याकडून किटलीत दूध आणल्यास ते दूध खोलगट पातेल्यात काढून ते फ्रिजरमध्ये ठेवावं. जेव्हा तापवायचं असेल तेव्हा दूध फ्रिजरमधून बाहेर काढून ते सामान्य तापमानाला येऊ द्यावं आणि मग गरम करावं. या युक्तीने कच्चं दूध 2 दिवसापेक्षाही जास्त काळ तापवलं नाही तरी फाटत नाही. 

Imsge: Google

2. एकदा तापवलेलं दूध फ्रिजमध्ये पडून राहिलं आणि मग ते पुन्हा वापरायला गेलं तर फाटतं असं होवू नये यासाठी दुधात चिमूटभर काॅर्न स्टार्च घालवं. यामुळे दुधातील घटक विलग होत नाही आणि दूध फाटत नाही. पण काॅर्न स्टार्च टाकताना ते चिमूटभरच घालावं, नाहीतर दूध घट्ट होतं आणि दुधाची चवही बिघडते. 

3. उन्हाळ्याच्या दिवसात दूध 3-4 वेळा गरम करुन ठेवावं. दूध गरम असतानाच फ्रिझमध्ये न  ठेवता ते सामान्य तापमानाला आलं की मग फ्रिजमध्ये ठेवावं. वरील 3 युक्त्या केल्यास दूध फाटण्याची चिंता नक्कीच दूर होईल! 

टॅग्स :अन्नकिचन टिप्स