वाढत्या वयानुसार शरीरात विविध समस्या उद्भवतात. वेळेनुसार कोणत्या न कोणत्या विशिष्ट गोष्टीची कमतरता शरीरात भासत असते. ज्यामुळे आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. शरीरासाठी लोह खूप महत्त्वाचं आहे. लोहाची कमतरता भासत असल्यास माणसाला नेहमी थकवा जाणवतो. शरीरात लोहाचे प्रमाण कमी झाल्यावर लाल रक्तपेशींची निर्मिती योग्य प्रकारे होत नाही. लोहाच्या कमतरतेला अॅनिमियाही म्हणतात. महिलांना अनेकदा अॅनिमियाचा त्रास होतो. शरीरात लोहाची कमतरता भासल्यास अनेक सुपरफुड्स खाण्याचा सल्ला दिला जातो. यात बीटरूटचा देखील समावेश आहे.
बीटरूटमध्ये भरपूर प्रमाणात फोलेट आढळते, जे पेशी वाढण्यास आणि चांगले कार्य करण्यास मदत करते. रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यात फोलेट महत्त्वाची भूमिका बजावते, ज्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. त्यात नैसर्गिकरित्या नायट्रेट्सचे प्रमाण जास्त असते, जे शरीरात नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होते, जे रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे. या धकाधकीच्या जीवनात बीटरूट खाणे काहींना जमत नाही, यासाठी आपण बीटरूटपासून तयार पावडर बनवून साठवू शकता. या पावडरपासून तयार ज्यूस आपण कुठेही, केव्हाही पिऊ शकता.
बीटरूट ड्रिंक बनवण्यासाठी लागणारं साहित्य
बीटरूट
कृती
सर्वप्रथम, बीटरूटला चांगले धुवून घ्या, त्यानंतर त्याचे काप करा. काप केल्यानंतर बीटरूटचे बारीक कीस करून घ्या. बीटरूटचे कीस केल्यानंतर उन्हामध्ये बीटरूटचे कीस वाळवत ठेवा. कीस वाळवून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात सुकलेले कीस बारीक पावडरप्रमाणे वाटून घ्या.
अशाप्रकारे आपली बीटरूट पावडर वापरण्यासाठी रेडी. एका ग्लासमध्ये पाणी घ्या. त्यात एक मोठा चमचा भरून बीटरूट पावडर टाका. चमच्याने ही पावडर पाण्यात मिक्स करून घ्या. दररोज हे एनर्जी ड्रिंक प्या. याने शरीराला नक्कीच फायदा होईल.