Join us  

गणपतीचे आवडते गूळ खोबरे खाण्याचे १० फायदे, देवाला नैवेद्य आपल्याला पौष्टिक प्रसाद...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2023 11:47 AM

Health Benefits Of Eating Coconut & Jaggery : गूळ, खोबरं वापरून तयार केलेले पदार्थ नुसते चवीला गोड लागतात म्हणून खाऊ नका, ते खाण्याने आरोग्याला होतात अनेक फायदे...

श्रावण महिना सुरु झाला झाला की आपल्याकडे वेगवेगळ्या सणांची रेलचेल सुरु होते. श्रावण महिन्यांत एकामागोमाग एक सण येत राहतात. या येणाऱ्या प्रत्येक सणाला आपल्याकडे काही खास गोडाधोडाचे पदार्थ केले जातात. श्रावणात वेगवेगळ्या प्रकारची व्रतं केली जात असल्यामुळे उपवासही पुष्कळ असतात. श्रावणी सोमवार आणि शनिवारचा उपवास तर हमखास केला जातो. उपवासाचे बहुतेक पदार्थ आपल्याला माहीत असतात किंवा आजकाल त्यात नवनवे प्रयोगही होत असतात, पण श्रावणातील उपवास सोडण्यासाठी देखील वेगवेगळे गोड, तिखट पदार्थ केले जातात. भारतीय परंपरेनुसार, आपल्याकडील बहुतेक गोड पदार्थांमध्ये गूळ (Jaggery) व ओल्या किंवा सुक्या खोबऱ्याचा वापर केला जातो(Health Benefits Of Eating Coconut & Jaggery).

गोड पदार्थ बनवण्यासाठी आपण साखर, गूळ यांसारख्या पदार्थांचा वापर करतो. या पदार्थांसोबतच आपण तीळ, शेंगदाणे, खोबरे असे पदार्थ देखील वापरतोच. सध्या गणेशोत्सव हा अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. गणपती उत्सव म्हटला की बाप्पाला आवडणारे गूळ(Jaggery), खोबऱ्याचे उकडीचे मोदक हे सगळ्या घरांमध्ये हमखास बनवले जातात. आपल्याकडे प्रत्येक सणाला बनवल्या जाणाऱ्या पदार्थांमागे काहीतरी विशेष कारण असते. गणपती बाप्पाला (What are the health benefits of eating coconut & jaggery?) अर्पण केल्या जाणाऱ्या सर्व नैवेद्यापैकी मोदक हे सर्वात प्रिय आहेत. त्यामुळे गणपतीला मोदकांचा नैवेद्य आवर्जून अर्पण केला जातो. मोदक तयार करण्यासाठी ओले खोबरे व गूळ, (Benefits of Eating Coconut With Jaggery) तांदळाचे पीठ यांचा वापर केला जातो. यामुळे मोदकातील सारणात प्रामुख्याने वापरले जाणारे गूळ, खोबर खाण्याने आरोग्याला नेमके कोणते फायदे होतात ते पाहूयात(Here are 10 unbeatable health benefits of eating jaggery with coconut).

गोड पदार्थांतील गूळ, खोबरं खाण्याने आरोग्याला होणारे फायदे... 

१. पोटाच्या अनेक समस्यांसाठी गूळ खूपच फायदेशीर ठरतो. जेवणानंतर थोडासा गूळ खाल्ल्याने पोटात गॅस तयार होत नाही. याशिवाय अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही सुटका होते.

२. शरीरातील ऊर्जा वाढवायची असेल किंवा आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत हवी असेल तर जेवणानंतर गूळ खाण्यास सुरुवात करावी.

सुबक कळीदार मोदक करण्याची १ झटपट ट्रिक - मोदक न जमणारेही करतील उत्तम मोदक...

३. गूळ खाल्ल्याने शरीरातील हाडे मजबूत होतात. कॅल्शियम, फॉस्फरस सारख्या पोषक तत्वांमुळे गूळ हाडांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. 

४. फॉलिक ॲसिड आणि बी कॉम्प्लेक्स यांचे प्रमाण देखील गुळामध्ये चांगले असते. त्यामुळे थकवा घालविण्यासाठी गूळ अतिशय उपयुक्त ठरतो.

प्रसादाचा शिरा परफेक्ट कसा करायचा ? शिरा भगराळा होऊ नये, गाठी राहू नये म्हणून सोप्या टिप्स...

५. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्याने ऍनिमिया सारखे आजार होण्याची शक्यता असते अशावेळी शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी गूळ खाणे अतिशय फायदेशीर ठरते. 

६. खोबरं खाल्ल्याने त्यातील चांगले फॅट्स त्वचेला पोषण देते, ते हायड्रेटेड ठेवण्यास देखील मदत करते. खोबरं खाल्ल्याने त्वचेच्या कोरडेपणापासून बचाव करता येतो. 

उकडीच्या मोदकांचे गणित जमत नाहीत, उकडताना फुटतात ? १० सोप्या टिप्स, कळीदार सुबक मोदक सहज जमतील...

७. स्त्रिया एका विशिष्ट वयानंतर अशक्त होतात. लोहाच्या कमतरतेमुळे हा अशक्तपणा येतो आणि यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अशावेळी रोजच्या जेवणांमध्ये खोबऱ्याचा वापर नक्की करावा. 

८. उपाशी पोटी ओलं खोबरं खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते. नारळात जास्त फायबर आणि कमी चरबी असते. रिकाम्या पोटी नारळ खाल्ल्याने भूक लवकर लागत नाही, व वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय नारळात ट्रायग्लिसराइड्स देखील असते, जे शरीरातील चरबी जाळण्यास मदत करतात.

सणावाराला भाज्या करताना करा झणझणीत ग्रेव्ही, ग्रेव्ही चमचमीत होण्यासाठी १३ सोप्या टिप्स, बेत जमेल मस्त...

गुलाबजामचा उरलेला पाक फेकून न देता करा झटपट होणारे गुलगुले, पाक वाया न जाता बनेल नवीन गोड पदार्थ...

९. नारळात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते. सकाळी रिकाम्या पोटी ओलं खोबरं खाल्ल्याने शरीराला नारळातील अँटीऑक्सिडंट्स मिळतात. अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून शरीराचे रक्षण करतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

१०. जर आपलं पोट खराब झालं असेल तर ओल्या खोबऱ्याचा एक मोठा तुकडा रात्री झोपण्यापूर्वी खा. यामुळे सकाळी आपले पोट साफ होण्यास मदत मिळते. खोबऱ्यामध्ये असणाऱ्या फायबरमुळे पोट साफ होते.

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सआरोग्य