Lokmat Sakhi >Food > नारळ वापरताना पाहा काय लक्षात ठेवायला हवे, विकत आणण्यापासून खवण्यापर्यंतच्या सगळ्या टिप्स

नारळ वापरताना पाहा काय लक्षात ठेवायला हवे, विकत आणण्यापासून खवण्यापर्यंतच्या सगळ्या टिप्स

Here are some tips to keep in mind while using coconut : नारळ विकत घेताना कसा तपासाल? तसेच खोबरे कसे खवायचे. पाहा सोप्या टिप्स.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2025 15:59 IST2025-04-06T15:58:18+5:302025-04-06T15:59:35+5:30

Here are some tips to keep in mind while using coconut : नारळ विकत घेताना कसा तपासाल? तसेच खोबरे कसे खवायचे. पाहा सोप्या टिप्स.

Here are some tips to keep in mind while using coconut | नारळ वापरताना पाहा काय लक्षात ठेवायला हवे, विकत आणण्यापासून खवण्यापर्यंतच्या सगळ्या टिप्स

नारळ वापरताना पाहा काय लक्षात ठेवायला हवे, विकत आणण्यापासून खवण्यापर्यंतच्या सगळ्या टिप्स

नारळाचा तसेच खोबऱ्याचा वापर घरोघरी केला जातो. भाजीमध्ये टाकायला तसेच आमटीमध्ये टाकायला छान ओला नारळ आपण वापरतो. (Here are some tips to keep in mind while using coconut)पदार्थाची चव दुप्पट होते. नारळाची वडी तर अप्रतिम लागते. ती ही आपण घरी तयार करतो. तसेच सुकं खोबरं वापरूनही अनेक पदार्थ आपण तयार करतो. चटणीसाठी वापरतो. विविध प्रकारचे चटपटीत पदार्थ तयार करताना खोबऱ्याचे वाटण करतो.(Here are some tips to keep in mind while using coconut)

भाजलेल्या खोबऱ्याचाही वापर करतो. नारळ हा रोजच्या वापरातील पदार्थ आहे असे म्हणायला हरकत नाही. मात्र नारळ सारखा खवायचा म्हणजे कंटाळवाणे काम आहे. (Here are some tips to keep in mind while using coconut)तसेच नारळ फोडायलाही अनेकांना जमत नाही. एवढंच नाही तर बाजारातून आणलेला नारळ खराबही निघतो. या काही गोष्टी लक्षात ठेवा नारळ विकत घेण्यापासून साठवून ठेवण्यापर्यंत सगळ्या टिप्स आहेत. 

१. नारळ विकत घेताना हलवून बघायचा. आत पाणी असले पाहिजे. तरच तो नारळ आहे. पाणी वाजले नाही याचा अर्थ तो आतून सुकलेला आहे. तो ताजा नाही. त्याची चव छान गोड येणार नाही. आपल्याला असे वाटते की नारळाचा आकार जेवढा मोठा नारळ तेवढा गोड. मात्र आकारावरून नारळाचा दर्जा ठरवता येत नाही. नारळाची शेंडीही छान फुललेली असेल तर तो नारळ विकत घ्या.

२. नारळ फोडताना अनेकांना भीती वाटते. उलट्या कोयत्याचा वापर करून नारळ फोडायचा. जड वस्तूंचा वापर करून नारळ फोडताना तो वाकडा तिकडा फुटतो. मग खवताना हाताला लागू शकते. म्हणून नारळ फोडताना आधी तो ओला करून घ्या. नंतर त्याच्या मध्य भागी उलट्या कोयत्याने मारा. एक तड त्या नारळाच्या मधोमध जाते. मग कोयत्याचा टोकेरी भाग त्या तडेमध्ये घुसवा आणि फक्त थोडा जोर द्या. नारळाचे दोन तुकडे होतील.

३. नारळ खवताना फारच वैताग येतो. कारण खुप वेळ लागतो. नारळ खवताना कडेकडेना खवायचा आणि एकाच रेषेत खवत जायचे. म्हणजे काळा भागही जास्त नारळात मिसळत नाही आणि खवताना त्रासही होत नाही. मधोमध नारळ कधीच खवायचा नाही. फ्रीजरमध्ये नारळ हवाबंद डब्यात साठवून ठेवा. 

४. खोबऱ्याची कवटी काढताना नाकी नऊ येतात. अगदी सोपा उपाय आहे. कवटीचा भार गॅसवर ठेवायचा आणि व्यवस्थित तापवून घ्यायचा. कवटी काळपट झाल्यावर गॅसवरून काढा आणि सुरीच्या मदतीने खोबरे आणि कवट आरामात वेगळी करता येते. अख्खीच्या अख्खी वाटी वेगळी होते.    
 

Web Title: Here are some tips to keep in mind while using coconut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.