आपण सगळेच रोजच्या जेवणामध्ये तुपाचा वापर करतो. वरण - भात, पोळी, खिचडी यांसारख्या गरमागरम पदार्थांवर आपण तूप घालून खातो. तूप हे रोजच्या रोज स्वयंपाक करण्यासाठी लागते म्हणून ते मोठ्या प्रमाणांत पुरवठ्याला येईल असे साठवले जाते. तूप हे आपण काहीवेळा घरीच बनवतो तर काहीवेळा ते बाहेरुन विकत आणतो. बाहेरून विकत आणलेले तूप हे बरेचदा महाग असते व ते तितकेसे पुरवठ्याला येत नाही. अशा परिस्थितीत, गृहिणी घरीच तूप तयार करण्याला प्राधान्य देतात(Does Ghee Go Bad? How to Store Ghee at Home).
तूप घरीच करायचे म्हटले तर त्याची प्रक्रिया ही खूपच लांबलचक असते. किमान ८ ते १० दिवस दुधावर येणारी साय एका वेगळ्या भांड्यात साठवून ठेवायची. ही साय फ्रिजमध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवली जाते. मग विरजण लावायचं. त्यानंतर लोणी कडवून त्यातून साजूक रवाळ तूप तयार होते. तूप बनवण्यासाठी फ्रिजमध्ये स्टोअर (Tips to store ghee to make it last long) करून ठेवली साय खराब होण्याची शक्यता असते. काहीवेळा त्याला एक प्रकारची दुर्गंधी येऊ लागते. म्हणूनच तूप बनवताना साठवली जाणारी साय योग्य पद्धतीने स्टोअर करून ठेवण्यापासून ते तूप बनवल्यानंतर देखील त्याची तितकीच काळजी (Ghee storage is a necessary process to keep ghee fresh) घ्यावी लागते. तूप बनवून झाल्यानंतर आपण ते एका मोठ्या काचेच्या स्वच्छ बरणीत स्टोअर करुन ठेवतो. परंतु काहीवेळा आपला ओला हात लागून किंवा इतर काही कारणांमुळे हे तूप खराब होते. तूप व्यवस्थित साठवून (Here Is Your Guide To Store Ghee In The Right Way) ठेवले नाही तर त्याला बुरशी लागते. असे खराब झालेले तूप फेकून द्यावे लागते. तूप बनवून झाल्यानंतर ते खराब होऊ नये यासाठी काही खास टिप्स लक्षात ठेवूयात(The Proper Way of Storing Ghee: 7 Ghee Storage Tips).
तूप खराब होऊ नये म्हणून सोप्या टिप्स...
१. जर आपल्याला अधिक काळ तूप टिकवायचे असेल तर तूप प्लास्टिकच्या डब्यात ठेवण्यापेक्षा स्टीलच्या किंवा मातीच्या भांड्यात ठेवा. यामुळे तुपाचा स्वाद आणि रंग दोन्ही खराब होणार नाही.
२. तूप हे नेहमी झाकूनच ठेवायला हवे. जर तुपाला हवा लागली किंवा यामध्ये पाणी गेले तर त्याचा स्वाद लवकर खराब होतो आणि तूप टिकतही नाही.
साजूक तूप करण्यासाठी साय साठवण्याच्या ५ सोप्या टिप्स, तूप होईल शुभ्र - रवाळ...
उकडीच्या मोदकांचे गणित जमत नाहीत, उकडताना फुटतात ? १० सोप्या टिप्स, कळीदार सुबक मोदक सहज जमतील...
३. बऱ्याच घरांमध्ये तूप हे फ्रिजमध्ये स्टोअर करून ठेवण्यात येतं. पण यामुळे तूप अधिक घट्ट बनते. त्यामुळे जेव्हा तूप खायचे असेल तेव्हा ते बरेचजण पुन्हा पुन्हा गरम करून घेतात, जे अजिबात योग्य नाही. तुपाचा डबा बाहेरच ठेवा. ज्यामुळे त्याचा मूळ स्वाद टिकून राहतो. त्याचा नैसर्गिक रवाळपणा टिकवून ठेवण्यासाठी तूप बाहेरच ठेवायला हवे. तसेच जर आपण तूप फ्रिजमध्ये ठेवणार असाल तर, ज्यावेळी खायचे आहे त्याआधी एक तास आधी तुपाचा डबा बाहेर काढून ठेवावा. जेणेकरून त्याचा घट्टपणा कमी होईल. सतत तूप गरम करणे टाळावे यामुळे ते लवकर खराब होऊ शकते.
४. तूप काढविताना त्यात चिमूटभर मीठ आणि साखर घालावी यामुळे तूप रवाळ बनून दीर्घकाळ टिकण्यास मदत होते. यासोबतच विड्याचे पान देखील आपण टाकू शकतो. कारण विड्याच्या पानात कॅल्शियम असते आणि तुपाच्या कणांना मोठे होण्यास मदत होते आणि तूप रवाळ बनते. तुपात २ ते ३ लवंगाही घालतात म्हणजे तुपाला चांगला सुवास येतो.
गुलाबजामचा उरलेला पाक फेकून न देता करा झटपट होणारे गुलगुले, पाक वाया न जाता बनेल नवीन गोड पदार्थ...
५. लोण्याचा गोळा एकदा स्वच्छ धुवून घ्यावा. त्यानंतर नॉनस्टिक भांड्यात लोणी ठेऊन मंद आचेवर गॅसवर ठेवावे. लोणी थोडा रंग बदलू लागल्यावर त्यातील बेरी खाली राहते आणि तूप वर येते. अशावेळी अगदी चिमूटभर मीठ घालावे आणि गॅस बंद करा. यानंतर एक चमचा पाण्याचा भपका त्यावर मारा. यामुळे आपले तूप दाणेदार तयार होईल.
६. जेव्हा आपण लोणी काढतो किंवा तूप बनवण्यासाठी साय जमा करुन ठेवतो, तेव्हा ती साय आंबट होऊ देऊ नका. यामुळे तूप व्यवस्थित बनत नाही व दीर्घकाळ न टिकता लवकर खराब होते.
७. तूप बनवण्यासाठी तुपासाठी साय साठवताना त्यात थोडेसे दही घालावे, यामुळे साय खराब होत नाही व तूप चांगले तयार होते.
पोळ्यांच्या डब्यातील पहिली पोळी वाफेने ओली होते ? २ सोपे उपाय, पोळी होणार नाही शिडशिडी...