बाहेरुन काटेरी आतून गोड असा फणस सगळ्यांना आवडतो. फणसाचे गोड गरे खायला खूपच छान लागतात. फणसापासून अनेक चविष्ट पदार्थ बनवले जातात. फणसाच्या गऱ्यांचे चिप्स, फणसाची भाजी, फणसपोळी असे वेगवेगळे पदार्थ बनवून खाल्ले जातात. फणस खायला कितीही चविष्ट लागत असला तरीही तो कापण्याचे कंटाळवाणे व वेळखाऊ काम कुणालाही आवडत नाही(How To Cut A Jackfruit).
फणसाच्या वरचे आवरण हे बऱ्यापैकी जाड असते. त्यामुळे फणस कापताना अधिक मेहेनत घ्यावी लागते. याचबरोबर फणसाच्या देटाकडील भागातून भरपूर प्रमाणत चीक बाहेर येत असतो. एवढेच नव्हे तर फणस आतून खूप चिकट असतो, त्यामुळे तो कापणे कठीण काम असते. वटपौर्णिमे निमित्त सगळ्यांच्याच घरात आतापर्यंत फणस आणले असतील. फणसाचा असलेला चिकटपणा व त्यातून निघणारा चीक यामुळे तो कापताना आपले हात, सूरी सगळंच (Here’s How You Can Cut, Clean & Enjoy jackfruit Without Any Hassle) खराब होऊन जातं. अशावेळी सूरी व हातांचा चिकट - तेलकटपणा जात नाही. त्यामुळे फणस कापताना काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर फणस कापण्याचे कंटाळवाणे काम झटपट होऊ शकते(How to Cut Jackfruit the right way).
फणस कापण्याच्या सोप्या ट्रिक्स...
१. फणसाचा आकार मोठा असल्याने तो संपूर्ण फणस एकदम एकाचवेळी कापणे शक्य होत नाही. अशावेळी फणसाचे दोन भाग करुन मग तो लहान लहान तुकडे करुन कापावा. यामुळे फणस कापणे सोपे जाते तसेच त्यातील गरे ही पटकन काढता येतात.
२. फणस कापण्यापूर्वी सुरीला व आपल्या हातांना तेल लावून घ्यावे. यामुळे फणसाचा चिकटपणा व चिक हाताला फारसा चिकटून राहत नाही. तसेच तेल लावल्यामुळे हातांचा चिकटपणा लवकर निघून जाण्यास मदत होते.
भेसळयुक्त पनीर कसे ओळखावे ? ३ सोप्या घरगुती ट्रिक्स, शुद्ध पनीर ओळखा झटपट...
३. कच्च्या फणसाची भाजी केली जाते. अशावेळी फणस कापल्यानंतर त्यातील गरे हे हळद - मीठ घातलेल्या पाण्यात बुडवून घ्यावेत. यामुळे त्या गऱ्यांचा चिकटपणा लगेच दूर होतो. यामुळे भाजी चिकट होत नाही, त्याचबरोबर भाजीची चवही छान लागते.
४. फणस कापल्यानंतर त्याचे गरे रुम टेम्परेचरला दोन तासांपेक्षा अधिक ठेवू नये, अन्यथा ते खराब होऊ शकतात. याउलट गरे सीलबंद कंटेनरमध्ये ठेवून मग ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. हे गरे शक्यतो एका आठवड्यात खाऊन संपवावेत.
५. फणस कापण्यापूर्वी तो आधी बाहेरुन पाण्याने धुवून संपूर्ण स्वच्छ करुन घ्यावा. त्यानंतर फणस कापण्यासाठी जमिनीवर कॉटनचे कापड किंवा पेपर अंथरुन घ्यावा. फणस कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुरीला व्यवस्थित धार आहे की नाही, ते आधी तपासून पाहावे. धारदार असणारी मोठ्या पात्याची सूरी वापरावी. मोठी सूरी नसेल तर २ लहान चाकूंचा वापर करावा.