Join us  

गव्हाची पोळी आणि प्रोटीनरिच? कणकेत मिसळा १ खास पदार्थ, पोळी खाऊनही घटेल वजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2024 12:08 PM

High Protein Atta - How To Make Protein rich Chapati : वजन कमी करायचं असेल तर, कणिक मळताना त्यात एक पौष्टीक पदार्थ मिसळा

गव्हाची चपाती आपल्या आहारात नेहमी असते (Protien rich Chapati). गव्हाची पोळी खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. गव्हाच्या पोळीमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात आढळते (Health Tips). पण जर आपण वेट लॉस करत असाल तर, फक्त गव्हाची पोळी खाऊ नका (Weight loss Chapati). त्यात काही गोष्टी मिसळून प्रोटीनयुक्त चपाती तयार करा.

मसल्स वाढवण्यासाठी आणि वेट लॉससाठी पनीर महत्वाचे ठरते. पनीरमध्ये कॅल्शिअम फॉस्फरस, सेलेनियम फायबर आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे हाडे मजबूत करण्याचे काम करतात. शिवाय त्यातील प्रोटीन मसल्स वाढवण्यासाठी आणि वेट लॉससाठी मदत करते. जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर, फक्त गव्हाची पोळी खाण्याऐवजी प्रोटीनयुक्त पोळी खा(High Protein Atta - How To Make Protein rich Chapati).

प्रोटीनरिच चपाती करण्यासाठी लागणारं साहित्य

लागणारं साहित्य

पनीर

गव्हाचं पीठ

केस गळून विरळ झालेत? बटाट्याच्या रसाचा करा सोपा उपाय; केस मुळापासून मजबूत होतील

चवीनुसार मीठ

लाल तिखट

धणे पूड

पाणी

कृती

सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात पनीर घ्या. त्यात पाणी घाला. चवीनुसार मीठ, लाल तिखट, धणे पूड घालून पेस्ट तयार करा. एका परातीत एक कप गव्हाचं पीठ घ्या. त्यात पनीरची तयार पेस्ट घालून कणिक मळून घ्या.

भिजवलेले १० बदाम रोज सकाळी खाण्याचे पाहा फायदे,वजन घटवा-मेंदूही होतो तल्लख

कणिक मळत असताना आपण त्यात गरजेनुसार पाणी घालू शकता. कणिक मळून झाल्यानंतर त्यावर कापड ठेवा. १० मिनिटानंतर गोळे तयार करा, व पोळपाटावर ठेवून लाटून घ्या. दुसरीकडे तवा गरम करण्यासाठी ठेवा. गरम तव्यावर पोळी घालून दोन्ही बाजूने भाजून घ्या. अशा प्रकारे चविष्ट आणि पौष्टीक प्रोटीनरिच पोळी खाण्यासाठी रेडी. आपणही पोळी कोणत्याही भाजीसोबत किंवा फक्त पोळी खाऊ शकता. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स