निरोगी राहण्यासाठी प्रत्येक वयोगटाने पौष्टीक आहार खाणं गरजेचं (High Protien Dal). पौष्टीक घटकांमध्ये प्रोटीनचा देखील समावेश करायला हवा. जर शरीराला मुबलक प्रमाणात प्रोटीन मिळावे असे वाटत असेल तर, आहारात डाळींचा अवश्य समावेश करायला हवा (Health Tips). प्रोटीन स्नायू, त्वचा आणि हार्मोन्स वाढविण्याचे काम करतात (Protien Packed Food).
प्रोटीन खाण्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे आहारात डाळी असायलाच हवं. पण अनेकदा एकच प्रकारची डाळ खाऊन कंटाळा येतो. जर आपल्यालाही एकच प्रकारचं वरण खाऊन कंटाळा आला असेल तर, पंचरत्न डाळ करून पाहा. पंचरत्न डाळ खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतोच, शिवाय शरीरातील प्रोटीनची कमतरताही दूर होते(High-Protein Diet: This Protein-Rich Panchratna Dal May Help You Lose Weight).
पंचरत्न डाळ खाण्याचे फायदे
आपण अनेक प्रकारच्या डाळी खातो. पण कधी पंचरत्न डाळ खाऊन पाहिलं आहे का? यात मूग, उडीद, वाटणा, हरभरा आणि मसूर डाळीचा समावेश केला जातो. आपण आपल्याला आवडीनुसार डाळींचा यात समावेश करू शकता. या ५ डाळींमुळे याला पंचरत्न डाळ असे म्हणतात. या ५ डाळीतील पौष्टीक घटकांमुळे आरोग्याला फायदा होतो.
रव्याचे लाडू फसतात-कडक किंवा मऊ होतात? १ कप रव्याचे लाडू करण्याची घ्या परफेक्ट रेसिपी
पंचरत्न डाळ खाण्याचे फायदे
- पाच डाळी एकत्र करून खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते. शरीराला एकाच वेळी अनेक पोषक तत्वांचा पुरवठा होतो. फायबर, लोह, प्रथिने, सर्वकाही मिळते. शिवाय पचनसंस्थाही उत्तमरित्या कार्य करते.
बदामच कशाला हवेत, 'या' ५ गोष्टी रोज पाण्यात भिजवून खा; बळकट हाडं - पोलादी होईल शरीर
- जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर, पंचरत्न डाळ अवश्य खा. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. ज्यामुळे आपण अतिरिक्त कॅलरीजचे सेवन करणं टाळतो.
- काही डाळींमध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असतात, जे कमी वयात वृद्धत्वाच्या लक्षणांपासून त्वचेचे संरक्षण करतात. ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.