Lokmat Sakhi >Food > अभिनेत्री भाग्यश्रीला आवडतात हेल्दी प्रोटीनरीच पॅटिस, पाहा रेसिपी; पौष्टिक नाश्ता खा भरपूर !

अभिनेत्री भाग्यश्रीला आवडतात हेल्दी प्रोटीनरीच पॅटिस, पाहा रेसिपी; पौष्टिक नाश्ता खा भरपूर !

Lentil Patties High Protein Food : actress bhagyashree shares High Protein Food Recipes Lentil Patties : भाग्यश्रीने सांगितलेले हेल्दी प्रोटीनरिच पॅटिस एकदा नाश्ताला करुन पाहाच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2024 09:40 AM2024-11-17T09:40:00+5:302024-11-17T09:40:02+5:30

Lentil Patties High Protein Food : actress bhagyashree shares High Protein Food Recipes Lentil Patties : भाग्यश्रीने सांगितलेले हेल्दी प्रोटीनरिच पॅटिस एकदा नाश्ताला करुन पाहाच...

High Protein Food Recipes Lentil Patties Protein packed patties actress bhagyashree shares High Protein Food Recipes Lentil Patties | अभिनेत्री भाग्यश्रीला आवडतात हेल्दी प्रोटीनरीच पॅटिस, पाहा रेसिपी; पौष्टिक नाश्ता खा भरपूर !

अभिनेत्री भाग्यश्रीला आवडतात हेल्दी प्रोटीनरीच पॅटिस, पाहा रेसिपी; पौष्टिक नाश्ता खा भरपूर !

आजकाल सगळेच आपल्या हेल्थची अधिक काळजी घेताना दिसून येतात. आपले आरोग्य आणि तब्येत चांगली राहावी यासाठी बरेचजण तेलकट, तुपकट पदार्थ खाणे सोडून देतात. याचबरोबर सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणात हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ खाण्यावर अधिक भर देतात. हेल्दी पदार्थ खायचे म्हणजे त्यात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश असलाच पाहिजे.सकाळच्या नाश्त्यात जर आपल्याला हेल्दी, पौष्टिक आणि प्रोटीनरीच पदार्थ खायचे असेल तर सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्रीने प्रोटीनरिच हेल्दी पॅटिसची रेसिपी नुकतीच इंस्टाग्रामवर शेअर केली आहे(Lentil Patties High Protein Food).

या व्हिडीओमध्ये भाग्यश्रीने हेल्दी, पौष्टिक प्रोटीनरीच पॅटिसची रेसीपी चक्क स्वतः करुन दाखवली आहे. सकाळच्या ब्रेकफास्टसाठी असे वेगवेगळ्या कडधान्यांपासून तयार केलेले हेल्दी प्रोटीनरीच पॅटिस हा तिचा आवडता नाश्ता असल्याचे देखील तिने सांगितले आहे. भाग्यश्रीने सांगितलेली हेल्दी प्रोटीनरिच पॅटिस रेसिपी पाहुयात(actress bhagyashree shares High Protein Food Recipes Lentil Patties).

साहित्य :- 

१. काळे चणे - १/२ कप 
२. राजमा - १/२ कप 
३. छोले - १/२ कप 
४. पांढरी उडीद डाळ - १/२ कप 
५. पाणी - गरजेनुसार 
६. मीठ - चवीनुसार 
७. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ 
८. लसूण - ६ ते ७ पाकळ्या 
९. आलं - १ टेबलस्पून 
१०. कोथिंबीर - २ टेबलस्पून 
११. तूप - १ टेबलस्पून 
१२. गरम मसाला - १ टेबलस्पून 
१३. आमचूर पावडर - १ टेबलस्पून 
१४. जिरे - १ टेबलस्पून 
१५. तेल - ४ ते ५ टेबलस्पून 
१६. काजू - ६ ते ७ काजू

पेरु जास्त पिकले, मऊ झाले? करा आंबटगोड पेरु कँडी, पेरुचा असा भन्नाट पदार्थ तुम्ही खाल्लाच नसेल...


१ कप मुगाच्या डाळीची इडली नाश्त्याला खा, महागडे प्रोटीन डाएट विसराल! करायला सोपी-पौष्टिक-लुसलुशीत...

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी घेऊन त्यात काळे चणे, राजमा, छोले, पांढरी उडीद डाळ घेऊन हि सगळी कडधान्य पाण्यात रात्रभर भिजत ठेवावीत. 
२. सकाळी यातील पाणी काढून टाकून कुकरमध्ये पाणी आणि मीठ घालून त्यात ही सगळी कडधान्य वाफवून घ्यावीत. 
३. वाफवून घेतलेली ही सगळी कडधान्य एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये एकत्रित वाटून घ्यावे. 

४. आता एका पॅनमध्ये थोडेसे तूप घेऊन त्यात हे पॅटिसचे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले मिश्रण ओतून हलकेच तुपावर परतून घ्यावे. 
५. तुपावर हे मिश्रण परतून झाल्यावर एका मोठ्या डिशमध्ये काढून त्यात गरम मसाला, आमचूर पावडर, जिरे, कोथिंबीर घालावे. 
६. आता हे मिश्रण एकजीव करून त्याचे छोटे गोलाकार पॅटिस तयार करुन घ्यावे. प्रत्येक पॅटीसवर आपल्या आवडीप्रमाणे एक काजू लावावा.  ७. एका पॅनमध्ये तेल घेऊन तेलावर हे पॅटिस दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावे.   

कडधान्य वापरुन तयार केलेले हेल्दी प्रोटीनरीच पॅटिस खाण्यासाठी तयार आहेत. हे पॅटिस आपण चटणी किंवा सॉस सोबत खाऊ शकता.

Web Title: High Protein Food Recipes Lentil Patties Protein packed patties actress bhagyashree shares High Protein Food Recipes Lentil Patties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.