प्रोटिन्सची कमतरता असणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. त्यातही महिलांचे आणि शाकाहारी लोकांचे प्रमाण अधिक आहे. म्हणूनच शरीरातली प्रोटीन्सची कमतरता भरून काढायची असेल तर हा प्रोटिन्स रिच नाचणी डोसा (High protein, high fiber food) एकदा खाऊन बघायलाच हवा. नाचणी डोसा खाल्ल्याने प्रोटिन्ससोबतच फायबरही भरपूर प्रमाणात मिळतील. फायबर असणाऱ्या अन्नपदार्थांचा आहारात समावेश नसेल तर वजन वाढीचा त्रास सुरू होतो. त्यामुळे जे लोक वेटलॉस करत आहेत, त्यांच्यासाठीही हा एक उत्तम ब्रेकफास्ट पदार्थ आहे (How to make Nachani dosa?). मुलांना डब्यात देण्यासाठी किंवा शाळा सुटल्यानंतर घरी आल्यावर काहीतरी चटपटीत, वेगळं खाण्याची इच्छा झाल्यास पटकन हा डोसा तयार करून देऊ शकता. (Gluten free ragi dosa recipe)
कसा करायचा नाचणी डोसा?साहित्य१ वाटी नाचणीचं पीठ
१ वाटी उडीद डाळीचं पीठ
१ टेबलस्पून बडिशेप
अर्धे लिंबू
२ मिरच्या
२ टेबलस्पून कोथिंबीर
१ टीस्पून आलं- लसून पेस्ट
चवीनुसार मीठ
ग्लुटेन फ्री नाचणी डोसा करण्याची रेसिपी१. हा डोसा करण्यासाठी उडदाची डाळ स्वच्छ धुवून ४ ते ५ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर डाळ मिक्सरमधून वाटून त्याची बारीक पेस्ट करून घ्या.
महिनाभरात वाढतील केस- होतील चमकदार, अभिनेत्री स्मिता शेवाळे सांगतेय तिच्या हेअर केअर टिप्स!
२. अंशुका यांनी नाचणीचं पीठ, उडीद डाळीचं पीठ, बडिशेप आणि मीठ या चार गोष्टीच वापरल्या आहेत. पण आपण डोसा आणखी थोडा चवदार होण्यासाठी त्यात इतरही काही पदार्थ टाकूया.
३. आता एका भांड्यात बारीक केलेली उडीद डाळ, नाचणीचं पीठ एकत्र करा.
४. मिक्सरमधून बडिशेप, कोथिंबीर, आलं- लसूण, मिरच्या बारिक वाटून घ्या आणि ती पेस्ट नाचणी- डडीद यांच्या एकत्रित पीठात टाका.
५. आता त्या मिश्रणात लिंबू पिळा. चवीनुसार मीठ टाका. पाणी टाकून नेहमीप्रमाणे डोसा करताना जसं पीठ भिजवता तसं भिजवून घ्या.
६. यानंतर तव्याला बटर लावून त्याचे गरमागरम कुरकुरीत डोसे करा.