Lokmat Sakhi >Food > ना तेल - ना सोडा, कपभर कडधान्याचा करा कुरकुरीत डोसा; अगदी १० मिनिटात वेट लॉस नाश्ता रेडी

ना तेल - ना सोडा, कपभर कडधान्याचा करा कुरकुरीत डोसा; अगदी १० मिनिटात वेट लॉस नाश्ता रेडी

High Protein Mixed Sprouts Dosa - Healthy Breakfast Weight loss recipe : उसळ नेहमीचीच एकदा कडधान्याचा डोसा ट्राय करून पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2024 05:52 PM2024-07-07T17:52:40+5:302024-07-07T17:53:39+5:30

High Protein Mixed Sprouts Dosa - Healthy Breakfast Weight loss recipe : उसळ नेहमीचीच एकदा कडधान्याचा डोसा ट्राय करून पाहा..

High Protein Mixed Sprouts Dosa - Healthy Breakfast Weight loss recipe | ना तेल - ना सोडा, कपभर कडधान्याचा करा कुरकुरीत डोसा; अगदी १० मिनिटात वेट लॉस नाश्ता रेडी

ना तेल - ना सोडा, कपभर कडधान्याचा करा कुरकुरीत डोसा; अगदी १० मिनिटात वेट लॉस नाश्ता रेडी

उत्तम आरोग्यासाठी कडधान्य खाणं गरजेचं आहे (Weight loss recipe). कडधान्यातून शरीराला अनेक फायदे मिळतात. मोड आलेल्या कडधान्यामध्ये 'क' जीवनसत्वे असते (Fitness). शिवाय यात प्रथिनं, जीवनसत्वे, खनिजं असतात (Cooking Tips). जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर, कडधान्याचा आहारात जरूर समावेश करावा. कडधन्य पचायला हलकी असते. यात फायबरचे प्रमाण जास्त असते.

आपण आहारात कडधान्याचा समावेश करू शकता. उसळ आपण खाल्लीच असेल. जर काहीतरी हटके खायचं असेल तर, कडधान्याचे डोसे करून खा. कुरकुरीत रेसिपी नाश्त्यासाठी बेस्ट, शिवाय आपण हा पदार्थ मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता(High Protein Mixed Sprouts Dosa - Healthy Breakfast Weight loss recipe).

कडधान्यांचा डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य

मोड आलेले मूग

मोड आलेले चणे

कोथिंबीर

हिरवी मिरची

मीठ

ना मिक्सर, ना तेल; फक्त कपभर हिरव्या वाटाण्याची करा झणझणीत चटणी, चवीला भन्नाट - एकदा करून तर पाहा

रवा

पाणी

कांदा

कृती

सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात एक कप मोड आलेले मूग आणि हरभरे घ्या. त्यात कोथिंबीर, ३ हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, एक कप रवा आणि एक कप पाणी घालून वाटून घ्या.

उपमा करताना रव्याच्या गुठळ्या होतात? १ भन्नाट ट्रिक; नाश्ता सेंटरला मिळतो तसा उपमा होईल भन्नाट

तयार मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्या. अशाप्रकारे डोश्याचं बॅटर रेडी होईल. दुसरीकडे नॉन स्टिक तवा गरम करण्यासाठी ठेवा. त्यात चमचाभर बॅटर ओतून पसरवा. आपण त्यावर किसलेला पनीर किंवा कांदा पसरवू शकता. आवडीच्या भाजीचा वापर आपण यात करू शकता.

गॅस मध्यम फ्लेमवर ठेवा. एक बाजू भाजल्यानंतर दुसरी बाजू देखील भाजून घ्या. अशा प्रकारे क्रिस्पी कडधान्यांचा डोसा खाण्यासाठी रेडी. आपण हा डोसा खोबऱ्याची चटणी किंवा सॉस सोबत खाऊ शकता. 

Web Title: High Protein Mixed Sprouts Dosa - Healthy Breakfast Weight loss recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.