आपले सौंदर्य आणि जादुई अदांनीसाठी फेमस असलेल्या जान्हवी कपूरचे (Janhvi Kapoor) अनेक फॅनस आहेत. अनेकांच्या हृदयावर राज्य करणारी जान्हवी सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आपली आई श्रीदेवीची हुबेहूब कॉपी असणारी जान्हवी खाण्यापिण्याच्या आणि डाएटच्या बाबतीतही तितकीच काळजी घेताना दिसते. आपल्या स्टाईलप्रमाणेच आपल्या डाएट प्लॅनमध्ये (Start your morning right with Janhvi Kapoor’s moong dal paneer chilla) नक्की काय हवे आणि फिटनेस कसा जपावा याचीही काळजी जान्हवी घेते. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी जान्हवी एक्सरसाइज सोबतच संतुलित आहार घेणे पसंत करते(Moong Dal Chilla with Paneer Stuffing).
तिच्या डाएटमध्ये ती फळे आणि भाज्यांचा समावेश करते. साखर आणि जंक फूडपासून ती नेहमीच लांब राहते. नाश्त्यामध्ये ती वेगवेगळे पदार्थ खाणे पसंत करते. यात तिला ब्राऊन ब्रेड, दूध, आणि प्रोटीन रिच मुगडाळ व पनीरचा चिला (Quick & Healthy Moong Dal Paneer Cheela) खायला फारच आवडतो. त्याचबरोबर तिला लंचमध्ये हिरव्या भाज्या, ब्राऊन राईस आणि कोशिंबीर खायला आवडते. जान्हवीचा आवडता ब्रेकफास्ट मुगडाळ व पनीरचा चिला नेमका कसा बनवायचा ते पाहूयात(Janhvi Kapoor’s Fav “Moong Dal Chilla with Paneer Stuffing” Recipe).
साहित्य :-
१. चिलाचे बॅटर तयार करण्यासाठीचे साहित्य :-
१. पिवळी मूग डाळ - १ कप २. आलं - २ इंचाचा छोटासा तुकडा ३. हिरव्या मिरच्या - २ ४. जिरे - १ टेबलस्पून ५. मीठ - १ टेबलस्पून ६. पाणी - १/४ कप
विराट कोहलीला आवडते तसे ‘प्रोटीन सॅलेड’ करा, वजन राहते नियंत्रणात आणि पचायला हलके-पौष्टिकही
२. चिलाच्या आतील फिलिंग तयार करण्यासाठीचे साहित्य :-
१. गाजर - १/२ कप २. कोबी - १/२ कप ३. शिमला मिरची - १/२ कप ४.आलं - २ इंचाचा छोटासा तुकडा ५. हिरव्या मिरच्या - २६. पनीर - २५० ग्रॅम ७. कोथिंबीर - १ टेबलस्पून ८. कांद्याची पात - १ टेबलस्पून ९. काळीमिरी पूड - चिमूटभर १०. तूप - गरजेनुसार
कृती :-
१. चिलाचे बॅटर तयार करण्याची कृती :-
१. एका बाऊलमध्ये पिवळी मूग डाळ घेऊन ती एक तास पाण्यांत भिजत ठेवावी. मूग डाळ पाण्यात भिजून झाल्यावर ती मिक्सरच्या भांड्यात ओतावी. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात आल्याकड तुकडा, हिरव्या मिरच्या, जिरे व चवीनुसार मीठ घालावे. गरजेनुसार पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित वाटून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्यावे. हे बॅटर मध्यम कन्सिस्टंन्सीचे असावे. जास्त पातळ किंवा जाडसर घट्ट करू नये.
२. चिलाच्या आतील फिलिंग तयार करण्याची कृती :-
१. गाजर, कोबी, शिमला मिरची एकदम बारीक कापून घ्यावे त्यानंतर आलं, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कांद्याची पात हे देखील एकदम बारीक चिरून घ्यावे. पनीर पातळसर किसून घ्यावे. आता एक मोठा बाऊल घेऊन त्यात या सगळ्या कापून घेतलेल्या भाज्या एकत्रित करून घ्याव्यात.
पावसाळ्यात दही खावे की अजिबात खाऊ नये ? एक्स्पर्ट सांगतात, खरंखुरं उत्तर-दही आवडत असेल तर..
मूग डाळ पनीर चिला कसा बनवावा ?
सगळ्यात आधी तवा घेऊन तो व्यवस्थित गरम करावा. गरम तव्यावर थोडेसे पाणी शिंपडून तो पुसून घ्यावा. त्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून त्यावर चिलाचे बॅटर ओतून त्याला डोशासारखा गोलाकार आकार द्यावा. आता आपण तयार करून घेतलेले पनीर आणि भाज्यांचे स्टफिंग त्या चिलावर घालून व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यावे. हे स्टफिंग चिलावर व्यवस्थित चिकटून बसण्यासाठी त्यावर हलकासा हाताने दाब द्यावा. मग वरून थोडी काळीमिरी पूड, चवीनुसार मीठ व तूप घालावे. अशाप्रकारे हा चिला दोन्ही बाजूंनी हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यावा.