Lokmat Sakhi >Food > ना ब्रेड-ना चटणी; हाय प्रोटीन नो ब्रेड सँडविचची सोपी कृती; पोट भरेल गच्च-वेट लॉससाठी उत्तम

ना ब्रेड-ना चटणी; हाय प्रोटीन नो ब्रेड सँडविचची सोपी कृती; पोट भरेल गच्च-वेट लॉससाठी उत्तम

High Protein Sandwich Without Bread | Ready in 15 minutes : सँडविच ते ही ब्रेड शिवाय? एकदा नो ब्रेड सँडविच करून पाहाच, नाश्ता होईल जबरदस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2024 12:03 PM2024-03-03T12:03:22+5:302024-03-03T12:04:18+5:30

High Protein Sandwich Without Bread | Ready in 15 minutes : सँडविच ते ही ब्रेड शिवाय? एकदा नो ब्रेड सँडविच करून पाहाच, नाश्ता होईल जबरदस्त

High Protein Sandwich Without Bread | Ready in 15 minutes | ना ब्रेड-ना चटणी; हाय प्रोटीन नो ब्रेड सँडविचची सोपी कृती; पोट भरेल गच्च-वेट लॉससाठी उत्तम

ना ब्रेड-ना चटणी; हाय प्रोटीन नो ब्रेड सँडविचची सोपी कृती; पोट भरेल गच्च-वेट लॉससाठी उत्तम

हेल्दी ब्रेकफास्ट म्हणून आपण बरेच जण सँडविच खातो. पण सँडविच खरंच पौष्टीक आहे का? त्यात वापरण्यात येणाऱ्या भाज्या पौष्टीक असतात. पण ब्रेडचं काय? ब्रेड मैद्यापासून तयार करण्यात येते, जे आरोग्याच्या दृष्टीने खाणं योग्य नाही (Healthy Recipe). त्यामुळे ब्रेडऐवजी आपण नो ब्रेड सँडविच तयार करून पाहू शकता (Cooking Tips). पण आता तुम्ही म्हणाल ब्रेड शिवाय सँडविच कसं काय शक्य आहे?

तर हो, आपण ब्रेड शिवायही सँडविच तयार करू शकता (Sandwich). नो ब्रेड सँडविच फक्त हेल्दी नसून, यातून मिळणाऱ्या प्रोटीन्समुळे आरोग्याला बराच फायदा होतो (No Bread Sandwitch). शिवाय वेट लॉससाठीही मदत होईल. नो ब्रेड सँडविच कसा बनवायचा? पाहूयात(High Protein Sandwich Without Bread | Ready in 15 minutes).

नो ब्रेड सँडविच तयार करण्यासाठी लागणारं साहित्य

मूग डाळ

पाणी

मीठ

कांदा

सिमला मिरची

दूध घातल्यानंतर गुळाचा चहा नासतो? चहा बनवताना लक्षात ठेवा एक खास टीप; फक्कड चहाची भन्नाट कृती..

हिरवी मिरची

चिली फ्लेक्स

ऑरिगॅनो

चीझ स्लाईज

कृती

सर्वप्रथम, एका भांड्यात २ कप मूग डाळ घ्या. त्यात २ कप पाणी घालून डाळ स्वच्छ धुवून घ्या. नंतर त्यात २ कप पाणी घालून रात्रभरासाठी भिजत ठेवा. सकाळी मिक्सरच्या भांड्यात भिजलेली डाळ घालून त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करताना त्यात पाणी घालणं टाळा, आणि शेवटी चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

कोशिंबीर नेहमीचीच, करून पाहा काकडीचा खमंग ढोकळा; इतका कुल की असा ढोकळा आवडेल सर्वांना

आता २ कांदे, सिमला मिरची, २ हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. आपण यात आपल्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता. चिरलेल्या भाज्या एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात अर्धा चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा ऑरिगॅनो, चवीनुसार मीठ घालून साहित्य एकजीव करा.

दुसरीकडे गॅसवर सँडविच तयार करणारं पात्र ठेवा. त्याला ब्रशने बटर लावा. गॅस मध्यम आचेवर ठेवा. नंतर त्यात एक चमचा मूग डाळीचं बॅटर ओतून पसरवा. नंतर त्यावर चिरलेल्या भाज्या घालून पसरवा. त्यावर एक चीझ स्लाईज ठेवा. त्यावर बॅटर ओतून कव्हर करा, व पात्राचं झाकण बंद करून दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. अशा प्रकारे नो ब्रेड प्रोटीनयुक्त सँडविच खाण्यासाठी रेडी.

Web Title: High Protein Sandwich Without Bread | Ready in 15 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.