Join us  

डाळ-तांदूळ कशाला? कपभर सोया चंक्स घ्या अन् वेट लॉस डोसा करा! क्रिस्पी डोसा-१० मिनिटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2024 12:45 PM

High Protein Soya Chunks Nutri Dosa Recipe : नाश्त्याला सोया चंक्स क्रिस्पी डोसा खाल तर, वजन कमी होईलच म्हणून समजा..

सकाळचा नाश्ता हा महत्वाचा असतो (Breakfast). नाश्तामध्ये पोहे, उपमा, इडली, डोसा, मेदू वडे आवडीने खाल्ले जातात. नाश्ता केल्याने दुपारपर्यंत आपल्याला भूक लागत नाही. शिवाय दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते. पौष्टीक नाश्ता खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. काही लोक हेल्दी म्हणून आवडीने साऊथ इंडियन पदार्थ खातात (Dosa Recipe). पण नियमित डाळ-तांदूळ भिजत घालून इडली-डोसे करायला जमतीलच असे नाही (Weight Loss Recipe).

जर आपल्याला हाय प्रोटीन डोसा खायची इच्छा झाली असेल आणि डाळ-तांदूळ भिजत घालायला विसरले असाल तर, सोया चंक्स हाय प्रोटीन डोसा तयार करा. कुरकुरीत सोया चंक्स डोसा खाल्ल्याने पोटही भरते, शिवाय आरोग्यालाही फायदे मिळतात. जर आपल्याला वेट लॉस करायचं असेल तर, ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे(High Protein Soya Chunks Nutri Dosa Recipe).

हाय प्रोटीन सोया चंक्स डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य

सोया चंक्स

रवा

दही

मीठ

'वो स्त्री है...' महिलेने सांगितलं साडी सावरत बस कशी पकडायची? नेटकरी म्हणाले..

इनो

पाणी

तेल

कृती

हाय प्रोटीन सोया चंक्स डोसा करण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात एक कप भिजवलेले सोया चंक्स घाला. त्यात एक कप रवा, एक कप दही आणि अर्धा कप पाणी घालून वाटून घ्या. ज्याप्रमाणे आपण डोश्यासाठी पीठ तयार करतो, त्याचप्रमाणे पीठ तयार करा.

तयार वाटलेलं पीठ एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा इनो घालून मिक्स करा. पीठ तयार झाल्यानंतर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅनला थोडे ब्रशने तेल लावा. पॅन गरम झाल्यानंतर त्यावर चमचाभर पीठ ओतून पसरवा. डोशाप्रमाणे आकार द्या, वरून कोथिंबीर पसरवा, व दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.

अशा प्रकारे हाय प्रोटीन सोया चंक्स डोसा खाण्यासाठी रेडी. आपण हा डोसा खोबऱ्याची चटणी, सांबार किंवा सॉससोबत खाऊ शकता.

सोया चंक्स खाण्याचे फायदे

उन्हाळ्यात साप जास्त निघतात? ३ सोप्या सुगंधी टिप्स, साप अंगणात-घरात फिरणार नाहीत

सोया चंक्स खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. यातील गुणधर्म अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करते. शिवाय सोय चंक्स प्रथिने समृद्ध असतात. ज्यामुळे मसल्स मजबूत आणि शरीर सुडौल होते. याव्यतिरिक्त त्यात खनिजे, कॅल्शियम, तांबे, जस्त, जीवनसत्वे आढळते. त्यामुळे पौष्टीक घटकयुक्त सोया चंक्स खा आणि फिट राहा. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स