बऱ्याचदा मुलांना आज डब्यात काय द्यावं हा प्रश्न त्यांच्या आईला छळत असतो (tasty and healthy snacks for tiffin). कारण डब्यातला पदार्थ वेगळा असावा, चवदार असावा अशी मुलांशी मागणी असते. तर तो पदार्थ तेवढाच पौष्टिक असायला पाहिजे, अशी आईची इच्छा असते. अशा एखाद्या पदार्थाच्या तुम्ही शोधात असाल तर डाळींचे चवदार आप्पे एकदा करून बघा (How to make appe using dal?). फक्त मुलांच्या डब्यासाठीच नाही तर घरातल्या सगळ्याच जणांसाठी नाश्त्याला हा एक उत्तम पदार्थ ठरू शकतो. बऱ्याचदा पाहुण्यांसाठी काही स्नॅक्स करायचं असेल, तर तेव्हाही हे आप्पे करू शकता. सगळ्यांना नक्कीच आवडतील. शिवाय त्यात भरपूर डाळी असल्याने त्यातून प्रोटिन्सही भरपूर मिळतात (High proteins healthy breakfast).
डाळींचे आप्पे करण्यासाठी लागणारे साहित्य
(How to Make Moong Daal Aappe)
२ वाट्या मुगडाळ
अर्धी वाटी उडीद डाळ
अर्धी वाटी मसूर डाळ
अर्धी वाटी हरबरा डाळ
अर्धी वाटी चवळीची डाळ
लिव्हर ठणठणीत ठेवणारी ४ योगासनं, रोज १० मिनिटांचा हा योगाभ्यास डिटॉक्सही करतो- लिव्हरही उत्तम
२ चमचे तुरीची डाळ
मुठभर तांदूळ
३ टेबलस्पून रवा
४ ते ५ हिरव्या मिरच्या. लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर
धने आणि जिरे प्रत्येकी २- २ टीस्पून
चवीनुसार मीठ
डाळींचे आप्पे करण्याची कृती
(How to Make Moong Daal Aappe)
१. सगळ्यात आधी वरील सगळ्या डाळी आणि तांदूळ एकत्रित करा आणि ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्या.
२. यानंतर धुतलेल्या डाळी आणि तांदूळ एका भांड्यात भरपूर पाणी टाकून त्यात ५ ते ६ तास भिजू घाला.
३. डाळी- तांदूळ छान भिजले की मिक्सरमध्ये हे मिश्रण टाकून व्यवस्थित वाटून घ्या.
Friendship Day: १०० रूपयांपेक्षा कमी किमतीत मित्रमैत्रिणींना द्या ६ भन्नाट गिफ्ट, दोस्त होतील खुश
४. मिक्सरमधून वाटून घेतानाच या मिश्रणात लसूण, मिरच्या, कोथिंबीर, धने आणि जिरे घाला. असे केल्याने ते मिश्रणासोबत अगदी एकजीव होतात आणि पदार्थाला छान चव लागते. हे मिश्रण खूप पातळ करू नये.
५. आता आप्पे पात्राला तेल लावा आणि तयार केलेले मिश्रण त्यात टाका. झाकण ठेवून वाफ आली की गरमागरम आप्पे झाले तयार.