Lokmat Sakhi >Food > Holi 2023 : मऊ- लुसलुशीत पुरण पोळ्यांसाठी पीठ मळण्याची १ सोपी टिप; पोळ्या फुटणार नाहीत..

Holi 2023 : मऊ- लुसलुशीत पुरण पोळ्यांसाठी पीठ मळण्याची १ सोपी टिप; पोळ्या फुटणार नाहीत..

Holi 2023 Holi Special Perfect Puran Poli Recipe : पुरण शिजवताना ते ओलसर असू नये अन्यथा पोळी फाटण्याची शक्यता असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 06:59 PM2023-03-05T18:59:12+5:302023-03-06T12:39:42+5:30

Holi 2023 Holi Special Perfect Puran Poli Recipe : पुरण शिजवताना ते ओलसर असू नये अन्यथा पोळी फाटण्याची शक्यता असते.

Holi 2023 : Perfect puran poli recipe puran poli recipe maharashtrian pooran poli tips | Holi 2023 : मऊ- लुसलुशीत पुरण पोळ्यांसाठी पीठ मळण्याची १ सोपी टिप; पोळ्या फुटणार नाहीत..

Holi 2023 : मऊ- लुसलुशीत पुरण पोळ्यांसाठी पीठ मळण्याची १ सोपी टिप; पोळ्या फुटणार नाहीत..

होळीच्या (Holi 2023) दिवशी प्रत्येकच्यात घरी पुरणपोळीचा बेत असतो. पुरणपोळी बनवत असताना सारण बाहेर येतं तर कधी पोळ्या फाटतात म्हणून अनेकजण पुरणपोळी बनवणं टाळतात. (Maharashtrian pooran poli tips)पोळ्या करताना काही सोप्या ट्रिक्स वापरल्या परफेक्ट पुरणपोळ्या अगदी कमीत कमी वेळात तयार होतील. (Perfect puran poli recipe)

परफेक्ट पुरणपोळी कशी बनवायची (How to make puran poli)

१) पुरणपोळी बनवण्याची सुरूवात चण्याची डाळ शिजवण्यापासून होते. चणाडाळ व्यवस्थित शिजवून निथळून घ्या. निथळून घेतलेल्या डाळीमध्ये बारीक केलेला गूळ घालता जातो. गूळ विरघळ्यानंतर डाळ काही प्रमाणात पातळ होते. त्यानंतर पुन्हा शिजवल्यानंतर डाळ पुरणात एकत्र होते. 

२) पुरण शिजवताना ते ओलसर असू नये अन्यथा पोळी फाटण्याची शक्यता असते. पुरणातलं पाणी व्यवस्थित आटेपर्यंत गॅसवर ठेवलं तर छान पोळीत बसतं आणि पोळी फुटत नाही. पुरणात झारा किंवा कोणताही चमचा उभा ठेवला तर तो व्यवस्थित उभा राहीलं असं असावं.

३) पुरण वाटल्यानंतर त्यात वेलचीपूड आणि जायफळ पूड घालावी. पुरण मऊ झाल्यावर कणीक भिजवायला सुरूवात करा.

४) पोळी मऊ होण्यासाठी कणीक मळण्याआधी पीठ  चाळून घ्यावं. त्यात थोडं मीठ घालून सैलसर भिजवून अर्धा तास तरी तसेच ठेवावे. नंतर तेलाचा आणि पाण्याचा हात लावून कणीक व्यवस्थित मळून घ्यावी.  कणकेला ताण सुटेपर्यंत मळून घ्या. 

५) पोळी लाटण्याआधी कणकेच्या गोळ्याला मैदा लावून घ्या. सगळ्यात आधी छोटा गोळा घेऊन पोळपाटावर थापून मोठा करायचा. तिप्पट चौपट मोठा पुरणाचा गोळा घेऊन सर्व बाजूंनी थापून पोळी मोठी करायची आणि मग लाटायची.

६) पुरणपोळी शेकताना गॅस मंद आचेवर असावा. तव्यावर पोळीवरची बाजू शेकायची. नंतर पोळी उलटा त्यानंतर पृष्ठभागावरचं पीठ रुमालानं वरचेवर काढून घ्यायचं. पोळी दोन्ही बाजूंनी सोनेरी लालसर झाल्यानंतर एका कागदावरून काढून दुसऱ्या मोठ्या कागदावर गार होण्यासाठी ठेवा. पोळी शेकताना तेलाचा वापर न करता साजूक तुपाचा वापर केल्यास उत्तम चव येते.  गार झाल्यानंतर पोळ्या डब्यात भराव्यात.

Web Title: Holi 2023 : Perfect puran poli recipe puran poli recipe maharashtrian pooran poli tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.