होळी आहे. किती रंग आपण आपल्याच आयुष्यातले यानिमित्ताने पुन्हा उजळताना पाहतो. अवतीभोवती मळभ वाटत असलं मनाला तरी क्षणात होळीचे रंग ते मळभ घालवून सारं जगणं आनंदाच्या रंगात उजळू लागतं. तीच उधळण आपल्याला निसर्गातही दिसते रंगांची. आपल्या खाण्यापिण्यातले रंगही आपलं मन प्रसन्न करतात. त्याच रंगात रंगलेला एक निळा चहा म्हणजे गोकर्ण चहा.
सुंदर रंग आपल्या आजूबाजूचे जग आकर्षक करतात. गोकर्ण चहाचेही तेच. त्यात जितके गहरे रंग तितके त्यात अँटी ऑक्सिडंट्स जास्त. चहातूनही असे काही पोषक घटक मिळतात की ज्यामुळे आपले चयापचय सुधारते.
(Image : google)
निळ्या चहाचे फायदे.
अँटी ऑक्सिडंट्समुळे शरीरातील इन्फलमेशन वा दाह कमी होतो.
त्वचा आणि केस यांच्यासाठी अतिशय उपयोगाचे पोेषण.
ताण कमी होतो आणि मूड देखील चांगला राहतो.
वजन कमी करण्यासाठी उत्तम.
कर्कराेग बचावासाठी उपयुक्त.
हृदयविकार, कोलेस्टेरॉल वाढ टळते.
चहा सोडायचा असेल तर अतिशय उत्तम पेय. हा निळा चहा.
(Image: google)
चहा कसा करायचा?
चहा करताना त्यांच्या पाकळ्या वेगळ्या करून त्या एकदा धुवून घ्यावा आणि वरून गरम पाणी टाकून १० ते १५ मिनिटे हे झाकून ठेवावे आणि मग गाळून प्यावे.
आपण यासाठी ताजी किंवा सुकलेली फुले देखील वापरू शकतो. लिंबू पिळले तर याचा रंग अजून डार्क होतो.
आवडले तर मध घालूनही हा चहा पिता येईल.