Lokmat Sakhi >Food > Holi Special Food : ऐनवेळी पुरण पातळ झालं तर? या ट्रिक्स वापरून पटापट बनवा मऊ, लुसलुशीत पुरणपोळ्या

Holi Special Food : ऐनवेळी पुरण पातळ झालं तर? या ट्रिक्स वापरून पटापट बनवा मऊ, लुसलुशीत पुरणपोळ्या

Holi Special Food : पुरणपोळ्या करताना काही ट्रिक्स  माहिती असल्या तर तुमचं काम नक्कीच सोपं होईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 11:57 AM2022-03-17T11:57:47+5:302022-03-17T13:09:13+5:30

Holi Special Food : पुरणपोळ्या करताना काही ट्रिक्स  माहिती असल्या तर तुमचं काम नक्कीच सोपं होईल.

Holi Special Food : Holi Special Recipes perfect poranpoli making tips | Holi Special Food : ऐनवेळी पुरण पातळ झालं तर? या ट्रिक्स वापरून पटापट बनवा मऊ, लुसलुशीत पुरणपोळ्या

Holi Special Food : ऐनवेळी पुरण पातळ झालं तर? या ट्रिक्स वापरून पटापट बनवा मऊ, लुसलुशीत पुरणपोळ्या

होळी म्हटलं (Holi 2022)  की पुरणपोळी (Puranpoli Recipe) आलीच. महाराष्ट्राच्या घराघरात या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जातो. पुरणपोळी खायला खूप सुंदर लागत असली तरी ते बनवणं म्हणजे खूप अवघड काम. कधी  पुरण पातळ होतं तर कधी खूपच घट्ट. ऐनवेळी काय करावं काहीच सुचत नाही. (perfect puranpoli making tips)   

पुरणपोळ्या करताना काही ट्रिक्स  माहिती असल्या तर तुमचं काम नक्कीच सोपं होईल. (Holi Special Recipes) या लेखात तुम्हाला पुरण पातळ झालं तर करायचं, पुरण शिजवताना कोणती काळजी घ्यायची हे सांगणार आहोत. (How to make perfect puranpoli) जेणेकरून तुम्ही तयार केलेल्या पुरणपोळ्या छान मऊ, लुसलुशीत आणि स्वादिष्ट होतील. (Perfect puranpoli making tips) 

१) चण्याची डाळ जास्त जोराच चोळून धुवू नये 

२) डाळ शिजवण्यापूर्वी कमीत कमी २ तास भिजत ठेवा.

३) डाळ शिजवण्यासाठी स्टीलचं  भांडं वापरा

४) डाळ शिजवताना त्यात एक चमचा तूप घाला जेणेकरून पुरण लवकर शिजेल आणि चिटकणार नाही

५) आवडीनुसार डाळ शिजवताना त्यात हळद घाला जेणेकरून छान रंग येईल. 

६) डाळीत थोडीशी साखर घातली तर पुरण लवकर शिजण्यास मदत होईल आणि चवही उत्तम येईल.

 

पुरण पातळ झाले तर फडक्याने पिळून घेता येते.
किंवा सरळ कढईत घालून, मंद गॅसवर परतून घेतले, उलथणे उभे राहू लागले की झाले पुरण.
अधिक माहितीसाठी पहा, सोबतचे व्हिडिओ

१)

२)

३)

Web Title: Holi Special Food : Holi Special Recipes perfect poranpoli making tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.