आपल्या आसपास अशी अनेक झाडं असतात जी औषधीय गुणधर्मांसाठी ओळखली जातात. यात तुळस, पुदीना, कढीपत्ता यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त काहीजण आपल्या घरात ओव्याचं झाडसुद्धा लावतात. ओव्यातील औषधी गुणधर्मांमुळे त्याची पानंसुद्धा खूप फायदेशीर ठरतात. ओव्याच्या झाडांचा वास दिवसभर घरात दरवळत राहतो. सकाळी सकाळी ओव्याची पानं चावल्यानं पोट चांगलं राहण्यास मदत होते.
याशिवाय अन्य शारीरिक समस्यांपासूनही आराम मिळतो. ओव्याचे रोप एखाद्या भांड्यातही लावता येते. आपण नंतर ते मोकळ्या ठिकाणी किंवा मोठ्या आकाराच्या भांड्यामध्ये हलवू शकता. घरी बियाणे आणून तुम्हीओव्याचं रोप लावू शकता. याव्यतिरिक्त आपण बाहेरून रोपटंही आणून ओव्याचं रोप लावू शकता. ओव्याचे झाड लावण्यासाठी तुम्हाला जास्त मेहनत करण्याची आवश्यकता नाही.
सुरूवातीला ओव्याच्या झाडाची व्यवस्थित वाढ झाली नाही तर दुसरं रोपटं लावा किंवा आधीच हेल्दी रोपटं विकत घ्या. रोप लावण्याआधी १ कप रेती, शेण खत, कोको पीट (cocopeat farming) एकत्र करा. शेणाचं कंपोस्ट रोप वेगानं वाढण्यासाठी फायदेशीर ठरेल. ओव्याच्या रोपासाठी जास्त खत वापरण्याची आवश्यकता नाही. झाड वाढायला सुरूवात झाल्यानंतर नियमित सुर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा, सकाळी आणि संध्याकाळी पाण्याचा फवारा मारा. सुरूवातीला २ तास रोप उन्हात ठेवा नंतर पुन्हा सावलीत ठेवून द्या.
कोणत्या ऋतूत ओव्याचं झाड लावायचं?
पावसाळा किंवा हिवाळा ओव्याचं झाड लावण्यासाठी उत्तम ठरतो. पावसाळ्याच्या वातावरणात गरमी आणि गारवा दोन्ही असल्यामुळे या रोपाचं नुकसान होत नाही. उन्हाळ्याच्या वातावरणात हे झाड लावल्यास वाढण्यात अडचड येऊ शकते. रोपटं वाढल्यानंतर मोठ्या कुंडीत शिफ्ट करू शकता.
ओव्याच्या पानांचा वापर भजी बनवण्याासाठीही केला जातो. पानांना तोडताना नेहमी खालून तोडण्याचा प्रयत्न करा. वरून तोडल्यानं वाढ व्यवस्थित होणार नाही. ओव्याच्या रोपट्याचे दाणे गरमीच्या वातावरणात पिकायला सुरूवात होते. ओवा १५० दिवसात पिकून तायर होतो. त्यावेळी रोपट्याची जास्त काळजी घ्यावी लागते.
या गोष्टींची काळजी घ्या
ओव्याच्या रोपट्याला लवकर किड लागत नाही. त्यामुळे अन्य किटकनाशक आणि खतांचा वापर करू नका, त्यामुळे झाड लवकर खराब होऊ शकतं.
ओव्याच्या रोपट्याला चांगलं उन दाखवण्यची गरज असते. रोज सकाळ, संध्याकाळ पाण्याचा फवाारा मारावा.जर मातीत मॉईश्चर असेल तर जास्त पाणी घालू नये.
काही वेळानंतर रोपामध्ये फंगस किंवा अन्य किडे दिसू येत असतील तर ऑर्गेनिक कीटनाशकांचा वापर करू शकता. साबण , हिंगाचे पाणी एकत्र करून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि रोपट्यावर स्प्रे करा.